नागपूर,
Bharat Gaurav Tourist Train : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे यात्रेकरूंसाठी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन जात आहे. यात पहिली ट्रेन ४ सप्टेंबर पासून तर दुसरी ट्रेन २० सप्टेंबर पासून धावणार आहे. दक्षिण भारत दर्शन यात्रेसाठी ही ट्रेन मध्य प्रदेशातील इंदूर, देवास, उज्जैन, शुजालपूर, सीहोर, संत हिरदााराम नगर, राणी कमलापती, इटारसी आणि नागपूर मार्गे जाणार आहे.
९ रात्री आणि १० दिवसांच्या प्रवासात तिरुपती, रामेश्वरम, मदुराई, आणि त्रिवेंद्रम ही प्रेक्षणीय स्थळे बघता येणार आहे. प्रवाशांना यासाठी १८,२०० रुपये प्रति व्यक्ती (स्लीपर इकॉनॉमी क्लास),३०,२५० रु. प्रति व्यक्ती (३थर्ड एसी - वर्ग) आणि ४०हजार रु. प्रति व्यक्ती (सेंकड एसी- आराम श्रेणी) प्रवास करता येणार आहे. तर दुसरी ट्रेन २० सप्टेंबर रोजी पुरी, गंगासागर भव्य काशी यात्रेसाठी सुटणार ही ट्रेन मध्यप्रदेशातील इंदूर, देवास, उज्जैन, शुजालपूर, सीहोर, राणी कमलापती, इटारसी, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी आणि अनुपपूर स्थानकांमधून जाणार आहे. ९ रात्र आणि १० दिवसांच्या प्रवासात पुरी, गंगासागर, गया, वाराणसी आणि अयोध्या ही प्रेक्षणीय स्थळे बघता येणार आहे. भारत गौरव ट्रेनच्या विशेष एलएचबी रेकमध्ये आरामदायी रेल्वे प्रवास करता येणार आहे. आणि ऑफ-बोर्ड जेवण, रस्ता वाहतूक आणि दर्जेदार बसमध्ये प्रेक्षणीय स्थळे बघता येणार आहे. कार्यक्रमानुसार निवास व्यवस्था, टूर एस्कॉर्ट्सच्या सेवेचा समावेश आहे. इच्छुक पर्यटकांना आयआरसीटीसी द्वारे बुकींग करता येणार आहे.