नवीन ४४ किमीच्या तिसर्‍या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे पूर्ण

13 Aug 2024 21:37:14
नागपूर,
Railway Marathi News : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने सेलू रोड स्थानकावर रविवारी नॉन-इंटरलॉकिंगचे कठीण काम यशस्वीरित्या पूर्ण केले. नागपूर-वर्धा रेल्वे मार्गावरील नवीन तिसर्‍या आणि चौथ्या रेल्वे लाईनच्या ७८.७ किमी लांबीच्या कामाकरिता रेल्वेची यंत्रणा कार्यरत होती. सेलू रोड स्थानकावर नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे रेल्वेने मोठा टप्पा गाठला आहे. विभागाने ४४ किमीचा तिसरा व चौथा मार्ग कमी वेळात पूर्ण करण्यासाठी चमू कार्यरत ठेवली होती. यानंतर आता उर्वरित मार्गावरील काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
 
 
LO K
 
नॉन-इंटरलॉकिंग कामासह दोन नवीन लूप लाइन, एक साइडिंग, एक लांब पल्ल्याची लूप लाइन आणि गाड्यांच्या क्रॉस हालचालीसाठी २० नवीन टर्नआउटच्या जोडल्या गेल्या आहेत. नॉन-इंटरलॉकिंगच्या कामात सध्याच्या यार्डला जोडल्या गेल्या आहेत. यामुळे रेल्वे वाहतूक सुधारणा करण्यासाठी मदत होणार आहे.
 
 
नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी रेल्वेने अंदाजे २५० कर्मचारी कार्यरत ठेवले. रात्रीच्या वेळी ट्रॅफिक ब्लॉक्सच्या वेळी सर्व नियोजित कामे वेळेच्या आत करण्यात आल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी दिली. सेलू रोड स्थानकावरील काम पूर्ण झाल्यामुळे नागपूर-वर्धा तिसरा व चौथा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला असल्याची माहिती रेल्वेचे अधिकारी पुष्कर श्रीवास्तव यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0