९१ वर्षीय प्रतिभा पुरोहित यांच्या हस्ते ध्वजारोहण

    दिनांक :17-Aug-2024
Total Views |
 
kotiwan
नागपूर, 
Independence Day महालक्ष्मी मंदिर मधुबन लेआउट येथे ७८ व्या स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यात आला. भारत पारतंत्र्यात असताना, जन्माला आलेल्या ९१ वर्षीय, प्रतिभा पुरोहित यांच्या हस्ते स्वातंत्र्याचा ७८ वा ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाला मंदिराचे अध्यक्ष शरदचंद्र लांबे, अतुल जोशी,सुधीर लेहगावकर, श्यामजी पंडित, प्रकाश दातार, नारायण ओक,विलास पुरोहित, सुहास पुरोहित, मेघा लेहगावकर, मृदुला पुरोहित, जयश्री पुरोहित ,अशोक वेले किरण धुळे,गुणवंत हर्षे, मोरेश्वर जोशी, गणेश केळकर श्रीरंग माईंणकर, शुभम लांबे, पिनाक लांबे, प्रणम्य लांबे, कामडी, शहाणे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक उपस्थित होते. पेढे वाटून स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सौजन्य: आसावरी कोठीवान, संपर्क मित्र