बांगलादेशमधील हिंदूविरोधात झालेल्या हिंसाचारामध्ये जमात-ए-इस्लामी कट्टरपंथी संघटनेचा सर्वांत मोठा वाटा

    दिनांक :18-Aug-2024
Total Views |
राष्ट्ररक्षा
Bangladesh violence : बांगलादेशात नुकतेच मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन झाले. बांगलादेशातील हिंदू विद्यार्थी आणि मोहम्मद युनूस यांची बैठक झाली. सत्तांतरानंतर हिंदूंवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात हे पाऊल उचलण्यात आले आहे. बैठकीत हिंदूंच्या सुरक्षेबाबत चर्चा केली जात आहे. ५२ जिल्ह्यांत हिंदूंवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात २०० हून अधिक घटना घडल्या आहेत. बांगलादेशातील नवनिर्वाचित सरकार मोहम्मद युनूस यांच्या सरकारने हिंदूंवर झालेल्या हिंसेबाबत चिंता व्यक्त केली. बांगलादेशी हिंदूंनी यासंदर्भात आठ केल्या आहेत; ज्यामध्ये हिंदू अल्पसंख्यकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नवा कायदा अंमलात आणावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
 
 
Bangladesh violence
 
पाकिस्तानच्या आयएसआयने हसीना यांच्यावर दबाव आणण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर केला. यामागे पाकिस्तानचा भारतविरोधी सरकार स्थापन करण्याचा उद्देश होता. हसीना यांच्या विरोधात आयएसआयचे स्लीपर सेल सक्रिय केले गेले असल्याची माहिती आहे. आयएसआय ढाक्यातील परिस्थिती बिघडविण्यासाठी जमात-ए-इस्लामी आणि त्यांची विद्यार्थी संघटना छात्र शिबिरचा वापर करत आहे. जमात-ए-इस्लामी ही संघटना पाकिस्तानच्या अत्यंत जवळची मानली जाते. त्यांना वेळोवेळी गुप्त निधी दिला जात आहे. त्यांना ढाक्यातील पाकिस्तानी अधिकार्‍यांकडून नियमित माहिती/सूचना मिळतात. चीनच्या राज्य आणि सुरक्षा मंत्रालयाने या आंदोलनाला पाठबळ दिले आहे. हसीना यांनी भारत आणि चीन यांच्यात असो किंवा इतर काही प्रकल्पांबाबत, कायम समतोल साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, चीनने भारताच्या आजूबाजूच्या देशांवर आपले नियंत्रण ठेवले आहे. बांगलादेशात लष्कराच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झाल्यास चीनशी जवळीक वाढेल, हा त्या मागील हेतू आहे.
 
 
बांगलादेश सरकारने माफी मागितली
Bangladesh violence : अंतरिम सरकारच्या गृह विभागाचे सल्लागार एम. शेखावत हुसैन यांनी अल्पसंख्यकांच्या सुरक्षेत झालेली ही एक मोठी चूक आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, ही चूक केवळ सरकारची नाहीतर अवघ्या कट्टरपंथींची आहे. दोन्हीही आपले कर्तव्य बजावण्यास असक्षम ठरले आहेत. बांगलादेशात हिंदूंवर झालेला हल्ल्याबाबत बांगलादेशच्या सरकारने माफी मागितली आहे. बांगलादेशातील हिंदू आपल्या सुरक्षेविषयी अत्यंत घाबरले आहेत. याचबरोबर भारतीय सीमेवर काहींनी पलायन केले आहे. बाजूला काही कट्टपंथीयांनी त्यांची क्रूर हत्या केली. त्यानंतर बांगलादेशच्या काही महिलांवर अत्याचार केला.
 
 
हिंसाचारामध्ये जमात-ए-इस्लामी संघटनेचा सर्वात मोठा वाटा
हिंदूंमध्ये झालेल्या हिंदू विरोधात झालेल्या हिंसाचारामध्ये बांगलादेशमधील जमात-ए-इस्लामी या कट्टरपंथी संघटनेचा सर्वात मोठा वाटा होता; याशिवाय अनेक युवक या हिंसाचारात सामील झाले, ज्यांचे मुख्य काम होते, हिंदूंच्या घरातून सामान पळवायचे, बायकांवर अत्याचार करायचा आणि सध्या उद्भवलेल्या हिंसाचारामध्ये आपला स्वतःचा फायदा करून घ्यायचा. मात्र, जमात-ए-इस्लामी हिंदू विरोधातील हिंसाचार हा अत्यंत जुना आहे. याची सुरुवात होते १९७१ साली झाली, ज्या वेळेला पाकिस्तानी सैन्याने जमातीच्या मदतीने १९७१ च्या युद्धापूर्वी ४० लाख त्यावेळीच्या ईस्ट पाकिस्तानी नागरिकांना मारले; ज्यामध्ये ३० लाख हे ईस्ट पाकिस्तानमधले होते आणि १० लाख हे तिथे असलेले तिथे अवामी लीग या पक्षाचे समर्थक होते. १९७१ नंतर अनेक वेळा बांगलादेशमध्ये वेगवेगळ्या कारणाने हिंसाचार झाला. त्यामध्ये सर्वात जास्त टार्गेट केले गेले ते तिथे असलेल्या हिंदूंना. बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या १९५० साली २४ टक्के एवढी होती; ती आता २०२४ मध्ये कमी होऊन आठ एवढी झाली आहे. गेलेले १६ टक्के हिंदू गेले कुठे? ते मारले गेले किंवा त्यांनी धर्म परिवर्तन केले किंवा काही भारतामध्ये पळून आले. आपण जमात-ए-इस्लामीच्या इतिहासावर थोडी चर्चा करूया.
 
 
जमात-ए-इस्लामीची स्थापना
Bangladesh violence : जमात-ए-इस्लामी ही एक धार्मिक व राजकीय संघटना आहे, ज्याचा प्रभाव दक्षिण आशियात विशेषतः पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशात दिसून येतो. संघटनेचा इतिहास वादग्रस्त असून अनेक विवाद आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये या संघटनेचा सहभाग आहे. विशेषतः बांगलादेशातील अशांतता आणि तेथील राजकीय घटनांमध्ये या संघटनेची महत्त्वाची भूमिका असल्याचे दिसते. जमात-ए-इस्लामीची स्थापना १९४१ साली मौलाना अबुल आला मौदुदी यांनी लाहोर येथे केली होती. संघटनेचे मुख्य ध्येय इस्लामिक राज्याची स्थापना करणे होते. त्यांनी इस्लामी आधारे समाज व शासन चालविण्याचे विचार मांडले. या संघटनेची सुरुवात धार्मिक विचारप्रणाली आणि राजकीय दृष्टिकोनाच्या आधारावर झाली.
 
 
जमात-ए-इस्लामीचा वादग्रस्त इतिहास
जमात-ए-इस्लामीचा इतिहास वादग्रस्त आणि विवादित घटनांनी भरलेला आहे. १९७१ साली बांगलादेशाच्या स्वातंत्र्य संग्रामादरम्यान जमात-ए-इस्लामीने पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचारात झाला. बांगलादेशातील अनेक या संघटनेवर मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे आरोप केले आहेत.
 
 
बांगलादेशमधील अशांततेत जमात-ए-इस्लामीचा सहभाग
बांगलादेशातील अशांततेत जमात-ए-इस्लामी आणि तिच्या विद्यार्थी संघटनेचा, छात्र शिबिराचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. विशेषतः २०१३ साली झालेल्या घटनांमध्ये जेव्हा या संघटनेच्या नेत्यांच्या विरोधात युद्धगुन्हे सिद्ध झाले, त्यावेळी बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. या हिंसाचारात जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे माध्यमांनी दाखवले आहे.
 
 
जमात-ए-इस्लामीला सरकारने कसा प्रतिसाद दिला?
बांगलादेशातील हसिना सरकारने जमात-ए-इस्लामीच्या विरोधात कठोर पावले उचलली. अनेक नेत्यांना युद्धगुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले असून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. २०१३ साली बांगलादेशातील न्यायालयाने जमात-ए-इस्लामीला राजकीय पक्ष म्हणून बेकायदेशीर ठरवले, ज्यामुळे या संघटनेच्या राजकीय कारवायांवर मर्यादा आल्या.
 
 
जमात-ए-इस्लामीबाबत हसीना यांची भूमिका
Bangladesh violence : पंतप्रधान शेख हसीना यांनी जमात-ए-इस्लामीच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी या संघटनेच्या हिंसक आणि विवादास्पद कारवायांच्या विरोधात कटाक्षाने पावले उचलली आहेत. हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जमात-ए-इस्लामीच्या अनेक नेत्यांना न्यायालयाच्या माध्यमातून न्यायालयीन कारवाईत अडकवले. जमात-ए-इस्लामीचे बांगलादेशातील पतन २०१० पासून सुरू झाले आहे. न्यायालयीन निर्णय, नेत्यांची फाशी आणि संघटनेच्या विरोधातील यामुळे संघटनेचा प्रभाव कमी झाला आहे. त्याचबरोबर सरकारने जमात-ए-इस्लामीच्या विविध शाखांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
जमात-ए-इस्लामीचा राजकीय प्रभाव
जमात-ए-इस्लामीचा राजकीय प्रभाव १९७१ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर कमी झाला आहे. परंतु, काही काळासाठी त्यांनी आपल्या राजकीय अस्तित्वाला जपले होते. त्यानंतर, न्यायालयीन निर्णय आणि सरकारच्या कठोर धोरणांमुळे त्यांच्या राजकीय कारवायांवर मर्यादा आल्या  आहेत .
 
 
जमात-ए-इस्लामीचा जागतिक प्रभाव
जमात-ए-इस्लामीचा जागतिक प्रभाव त्याच्या धार्मिक विचारधारांमुळे असून त्याचे विचार पाकिस्तान, भारत आणि इतर मुस्लिम राष्ट्रांमध्ये लोकप्रिय आहेत. तथापि, त्यांच्या हिंसक कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या विचारधारेवर टीका होत आहे.
 
 
निष्कर्ष
Bangladesh violence : जमात-ए-इस्लामी ही एक वादग्रस्त आणि विवादास्पद संघटना आहे. तिच्या इतिहासात अनेक हिंसक घटना आणि विवाद आहेत. बांगलादेशातील भूमिकेवर आधारित, हा संघटना आता राजकीय दृष्टिकोनातून आणि जागतिक स्तरावर मागे पडली आहे. सरकारच्या कठोर धोरणांमुळे तिच्या राजकीय कारवायांवर मर्यादा आल्या असून तिचा प्रभाव कमी झाला आहे. जमात-ए-इस्लामी ही संघटना तिच्या इतिहासातील वादग्रस्त भूमिकेमुळे विशेषतः बांगलादेशमध्ये खूपच विवादित ठरली आहे. स्वतंत्र बांगलादेशाच्या स्थापनेनंतर या संघटनेला त्याच्या युद्धगुन्ह्यांसाठी कठोर प्रतिसाद बांगलादेशमध्ये सरकारविरोधात चालू असलेल्या हिंसक आंदोलनांमध्ये त्यांच्या मोठा वाटा होता. मात्र आता येणार्‍या काळामध्ये आणि येणार्‍या सरकारमध्ये त्यांच्या राजकीय प्रभाव हा अत्यंत महत्त्वाचा असेल. कारण हसीनाच्या विरोधात असलेली बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी पूर्णपणे जमात-ए-इस्लामीच्या प्रभावाखाली आहे. यामुळे असे मानले जाते की, येणार्‍या काळामध्ये बांगलादेशमधील हिंदूंचे भवितव्य अतिशय कठीण होणार आहे. सरकारने बांगलादेशमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून तिथल्या अल्पसंख्यक हिंदूंचे रक्षण करायला पाहिजे. नाहीतर येणार्‍या पाच वर्षांमध्ये बांगलादेशी हिंदूंची संख्या ही सध्याच्या आठ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर येईल.
ब्रिगेडियर हेमंत महाजन
९०९६७०१२५३
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)