कानोसा
- अमोल पुसदकर
Partition-Pakistan-Bangladesh १९०५ मध्ये इंग्रज सरकारने बंगालचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळेस लोकांनी या वंगभंगाचा विरोध केला त्यावेळेस तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन म्हणाला की, हा कायदा संसदेमध्ये पारित करण्यात आलेला आहे. त्यामुळे बंगालचे विभाजन झालेले आहे. याला आता कोणीही बदलवू शकणार नाही. Partition-Pakistan-Bangladesh परंतु रक्षाबंधनाच्या दिवशी हजारो लोक गंगा नदीच्या किनाऱ्यावर एकत्र आले. त्यांनी 'वंदे मातरम्'च्या घोषणा दिल्या आणि परस्परांना रक्षासूत्र बांधून बंगालचे विभाजन समाप्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा घेतली. Partition-Pakistan-Bangladesh यामुळे संपूर्ण समाज जोडला गेला व तो वंगभंगाच्या विरोधात पेटून उठला. इंग्रजांनी कायदा पारित केला होता परंतु लोक या कायद्याला मानायला तयार नव्हते. इंग्रजांना बंगालचे विभाजन करून दोन भाग करायचे होते. Partition-Pakistan-Bangladesh त्यामध्ये एक मुस्लिमबहुल बंगाल व दुसरा हिंदुबहुल बंगाल. हिंदूंनाच काय पण मुसलमानांना सुद्धा ही इंग्रजांची नीती आवडलेली नव्हती. इंग्रजांनी ढाक्याच्या नवाबाला १४ लक्ष रुपये देऊन त्याला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. ढाक्याच्या नवाबानेसुद्धा मुसलमानांना बंगालचे विभाजन कसे आवश्यक आहे व मुसलमानांच्या फायद्याचे आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.
Partition-Pakistan-Bangladesh परंतु तरीसुद्धा राष्ट्रवादी शक्ती एवढ्या बलवत्तर होत्या की मुसलमानसुद्धा इंग्रजांच्या या नीतीला बळी पडले नाही. ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने आणि इंग्रजांचा बहिष्कार सुरू झाला. यातूनच स्वदेशीचे आंदोलन उभे राहिले. सर्व लोकांनी इंग्रजांच्या वस्तूंचा बहिष्कार केला. इंग्रजांचे कापड, विदेशी वस्तू यांच्यावर बहिष्कार सुरू झाला. समाजातल्या सर्व स्तरातील लोकांनी हा बहिष्कार केला. लग्न लावणारे पुरोहित म्हणू लागले की जर कोणी विदेशी कपडे घालून लग्नाला उभा राहील तर आम्ही लग्नाचा विधी करणार नाही. Partition-Pakistan-Bangladesh चप्पल शिवणारा म्हणू लागला की मी विदेशी चपला शिवणार नाही. विदेशी मिठाईचादेखील बहिष्कार करण्यात आला. जनतेने विदेशी वस्तूंची होळी केली. पुण्यामध्ये विदेशी कपड्यांची होळी झाली. लोकांनी हातमागावर विणलेल्या वस्त्रांना प्राधान्य देणे सुरू केले. एकेकाळी मुंबईमध्ये मँचेस्टर कापडाचे चाळीस हजार गठ्ठे एका वर्षात विकले जायचे. परंतु १९०५-१९०६ या वर्षांमध्ये केवळ चाळीस गठ्ठेच विकले गेले. म्हणून मुंबईच्या व्यापाऱ्यांनी मँचेस्टरला पत्र लिहून ही परिस्थिती कळविली. Partition-Pakistan-Bangladesh त्याचा परिणाम असा झाला की इंग्लंड सरकारने भारत सरकारला विचारले की, जर इतका रोष लोकांचा होतो आहे व त्यामुळे आपला व्यापार प्रभावित होतो आहे तर आपण हा निर्णय रद्द का करीत नाही. आणि याचा परिणाम म्हणून पुढे बंगालची फाळणी रद्द झाली.
जी गोष्ट नि:शस्त्र जनता बहिष्काराचे तंत्र वापरून करू शकली तीच गोष्ट १९४७ साली मात्र होऊ शकली नाही. ज्या जनतेने बंगालचे विभाजन रोखले ती जनता नेत्यांपुढे हातबल ठरली. इंग्रज मुस्लिम लीग व काँग्रेसचे नेते यांनी देशाच्या विभाजनाला संमती दिली. देशाची जनता विभाजनाच्या बाजूने नव्हती. Partition-Pakistan-Bangladesh तरीसुद्धा देशाचे विभाजन झाले. रक्षाबंधनाच्या सणाचा उत्सव लोकांनी एकमेकाला रक्षासूत्र बांधून केला व त्यातून जनसामान्यांमध्ये जागृती झाली. लोक एकत्र आले. रक्षाबंधन सणाचा, उत्सवाचा असा उपयोग पारतंत्र्यात होऊ शकला. आजही हा सामाजिक संदेश आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आज बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. या विरुद्ध संपूर्ण समाजाने पेटून उठायला हवे. हिंदूंवर जर अत्याचार झाले तर बांगलादेशाशी व्यापार पुढे करायचा नाही अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा व्यापारी व जनता घेऊ शकते. Partition-Pakistan-Bangladesh याच व्यापाराच्या जोरावर पारतंत्र भारत इंग्रज सरकारला नमवू शकला तर याच व्यापाराच्या जोरावर भारत बांगलादेशला हिंदूंच्या सुरक्षिततेकरिता बाध्य का करू शकणार नाही, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे.
निवडणुकीच्या काळामध्ये ‘संविधान खतरे में है' अशा पद्धतीची घोषणा दिली गेली व विशिष्ट समाजामध्ये एक भयाचे वातावरण निर्माण करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाला. परंतु त्याचवेळी असा कुठलाही बदल संविधानामध्ये केला जाणार नाही, असे सांगणारे लोक सुद्धा होते. परंतु विरोधी पक्षांचा आवाज हा मोठा होता, विरोधी पक्षांचे संबंध आणि संपर्क या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर होते. Partition-Pakistan-Bangladesh यातून आपल्या काय लक्षात येईल की ज्या समाजाला सहजासहजी भ्रमित केले जाऊ शकते, त्या समाजामध्ये सुद्धा आमचे चांगले संबंध असणे गरजेचे आहे.रक्षाबंधन हे निमित्त आहे. या निमित्ताने आपल्या परिसराच्या सभोवताल असणाऱ्या कुठल्यातरी सेवा वस्तीमध्ये आम्ही या सणाच्या निमित्ताने गेलो पाहिजे व त्यांना सुद्धा रक्षासूत्र बांधून ते सुद्धा या राष्ट्राचे एक अंगभूत घटक आहे, ही जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण केली गेली पाहिजे. कारण अशा समाजाचा फायदा आज विरोधी पक्षाने घेतला, उद्या विदेशी शक्ती घेतील हे दोन्ही पण धोके आहेतच.
सुदृढ लोकशाहीसाठी हा फार मोठा धोका आहे. त्यामुळे कुठलाही समाज निरक्षर राहणार नाही, सामाजिकदृष्ट्या अस्पृश्य राहणार नाही, समाज म्हणून सर्व लोक एक राहतील याचा प्रयत्न केला पाहिजे. आता विविध समाजांच्या आरक्षणाच्या मागण्यांसाठी समाजांमध्ये आंदोलने उभी केली जात आहेत. त्यातून समाजा-समाजांमध्ये तेढ आणि वाद निर्माण होत आहे. ही परिस्थितीसुद्धा सामाजिक ऐक्यासाठी चांगली नाही. Partition-Pakistan-Bangladesh महाराष्ट्राचा बांगलादेश होऊ शकतो, अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा काही पुढारी करताना आपल्याला दिसून येतात. यावरून आपण एवढेच लक्षात घेतले पाहिजे की सामाजिक स्वास्थ्य चांगले नाही, ते बिघडलेले आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी व कोणीही एकटा नाही, कोणीही असुरक्षित नाही, सर्व लोक समाजाच्या पाठींब्याने सुरक्षित आहे, अशा पद्धतीचा संदेश दिला गेला पाहिजे.