नागपूर ,
Chitnavis Centre Nagpur शुक्रवार दि. ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजता, चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स येथे दिग्गज कवी विंदा करंदीकर यांच्या १ ० ७ व्या जयंतीनिमित्त साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.हा कार्यक्रम चिटणवीस सेंटर व "सगळे मिळून सगळ्यांसाठी, वर्धा" यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होणार आहे .
रवींद्र पंढरीनाथ, अनुराधा मोहोनी, सुनील फरसोळे आणि मीरा इंगोले यांच्या आकर्षक सादरीकरणातून विंदांच्या कालातीत कविता, गाणी आणि गद्याचे सौंदर्य रसिकांसमोर मांडले जाईल.Chitnavis Centre Nagpur आयोजकांनी सर्व साहित्यप्रेमींना विंदा करंदीकर यांच्या काही सुंदर कलाकृतींचा आस्वाद घेण्यास आमंत्रित केले आहे.प्रवेश विनामूल्य आणि सर्वांसाठी खुला आहे.
सौजन्य: योगिता चकोले,संपर्क मित्र