नवी दिल्ली,
Govind Mohan : १९८९ च्या सिक्कीम कॅडरचे आयएएस अधिकारी गोविंद मोहन यांनी आज केंद्रीय गृहसचिव पदाची सूत्रे स्वीकारली.
मावळते गृहसचिव अजयकुमार भल्ला यांच्याकडून गोविंद मोहन यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली. भल्ला प्रदीर्घ काळ म्हणजे पाच वर्षे गृहसचिव होते. गृहसचिव म्हणून सलग चार वेळा भल्ला यांना मुदतवाढ मिळाली. मूळ उत्तरप्रदेशचे असलेले गोविंद मोहन २०१७ पासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. सप्टेंबर २०१८ पर्यंत ते गृहमंत्रालयात संयुक्त सचिव होते. सप्टेंबर २०१८ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी काम केले. गृहसचिव म्हणून नियुक्त होताना गोqवद मोहन संस्कृती मंत्रालयाचे सचिव होते. गृहसचिव म्हणून त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळू शकतो.