भाजपाने 44 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

    दिनांक :26-Aug-2024
Total Views |
श्रीनगर, 
BJP announced list of candidates जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत भाजपाचे वरिष्ठ नेते विजयासाठी रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. या मालिकेत रविवारी रात्री भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. दरम्यान, भाजपच्या 44 उमेदवारांची पहिली यादी आज आली आहे. भाजपच्या मुख्यालयात काल केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत भाजपचा उमेदवार कोण असेल यावर चारमंथन झाले. उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात झालेल्या वेगळ्या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. हेही वाचा : एकच उपाय राष्ट्रपती राजवट
  

BJP announced list of candidates 
यावेळी जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत रंजक लढत पाहायला मिळणार आहे. एकीकडे भाजपा सर्व 90 जागांवर एकट्याने निवडणूक लढवत आहे, तर काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती केली आहे. BJP announced list of candidates मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष पीडीपीही सध्या एकट्याने रिंगणात उतरला आहे, तर यावेळी पहिल्यांदाच आम आदमी पक्षही जम्मू-काश्मीर निवडणुकीत नशीब आजमावत आहे. 
यापूर्वी 2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. BJP announced list of candidates तेव्हा हे राज्य केंद्रशासित प्रदेश नव्हते. त्या निवडणुकीत पीडीपीला 28, भारतीय जनता पक्षाला 25 जागा, जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सला 15 आणि काँग्रेसला 12 जागा मिळाल्या होत्या. नंतर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भाजपाने मिळून सरकार स्थापन केले.