एकच उपाय राष्ट्रपती राजवट

26 Aug 2024 05:08:38
वेध 
 
- चंद्रकांत लोहाणा
Kolkata-Rape-TMC कोलकाता येथील निर्भया-२ प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. याची धग काही दिवसांनंतर शांत होईलही. समाजमन सर्वकाही विसरून आपल्या कामात दंग होईल. तरीही काही प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहतील. ज्यांचे या घटनेने हृदय हेलावले असेल त्यांच्या मनामध्ये एक कायमची सल बोचत राहते. Kolkata-Rape-TMC समाजामध्ये असे नराधम जन्माला येतातच कसे, असा त्यांचा प्रश्न असतो. ज्या देशामध्ये मातृशक्तीची आदीशक्ती म्हणून पूजा केली जाते, त्या देशामध्ये असे जघन्य अपराध जर घडत असतील तर देशातील सुसंस्कृत समूहाने याबाबीची दखल घेत अशा प्रवृत्तींना आधीच ठेचण्यासाठी सज्ज असायला हवे. Kolkata-Rape-TMC समाज संस्कृतीपासून दूर गेला अन् संस्कृतीची फारकत झाली की, समाजाचे आरोग्य बिघडते. आम्ही आमच्या परंपरा आणि चालीरीती सध्या खुंटीला टांगून ठेवल्याने समाजामध्ये नको त्या गोष्टींनी शिरकाव केला आहे. त्यामुळे अशा निरपराधांना त्याची नाहक सजा भोगावी लागते. पीडितेचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते.
 हेही वाचा : गुजरातमध्ये ट्रॅक्टर उलटल्याने 17 जण पाण्यात बुडाले
 

Kolkata-Rape-TMC 
 
 हेही वाचा : नक्षलवाद-माओवादावर शेवटचा प्रहार
Kolkata-Rape-TMC हृदयात झालेल्या जखमांना कुरवाळीत अख्ख आयुष्य आई-वडिलांना जगाव लागतं. आमच्या संस्कृतीला हीन समजत आम्ही पाश्चिमात्य संस्कृतीच्या मागे फरफटत गेलो. त्याची फळे आज आम्ही भोगत आहोत. या अधोगतीच्या चक्राने संपूर्ण समाज पोखरत चालला आहे. तरीही आमची कुंभकर्णी झोप अजूनही उघडत नाही. खरं तर अशा सुसंस्कृत देशामध्ये कोठेच अश्लिलतेला स्थान असायला नको. ऋषी, मुनी व गुरू परंपरेने नटलेल्या या देशामध्ये सभोवताली घडणाऱ्या घटना बघितल्या की मन विषन्न होते. आधुनिकता ही जरी आज काळाची गरज असली तरी, ती कितपत आत्मसात करावी याचे भान असायला हवे. निव्वळ आधुनिकतेच्या मागे लागून अधोगतीशी आम्ही जुळणार असू तर ही आधुनिकता समाजाला रसातळाला नेणारी ठरू शकते. ही सजगता जोवर समाजमन ठेवणार नाही, तोवर आमच्या मनामधील प्रश्नाचे उत्तरही आम्हाला मिळणार नाही. महिला डॉक्टरच्या हत्येनंतर पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकारही वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडले आहे.
 
 
 
Kolkata-Rape-TMC संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या गुंडांचे एकछत्री राज्य आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कितीही लोकशाहीच्या गप्पा मारीत असल्या तरी त्यांच्या गुंडांनी माजवलेली अराजकता तेथील सामान्य जनतेसाठी अभिशाप ठरली आहे. महिला डॉक्टरचे हे प्रकरण ज्याप्रकारे हुकुमशाही पद्धतीने दडपण्याचा आटोकाट प्रयत्न तेथील अधिकाèयांनी केला त्यावरून हेच सिद्ध होते. ममता बॅनर्जी स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे गृह विभाग असून आरोग्य विभागही त्या स्वत: सांभाळतात. तरीही कोलकातामध्ये ममता बॅनर्जी पदयात्रा काढून त्या महिला डॉक्टरबाबत न्यायाची मागणी करतात. केवढे हे त्या पीडिताचे, तिच्या कुटुंबाचे आणि समाजाचे दुर्दैव. जनतेला न्याय देणाऱ्या खुर्चीवर विराजमान असतानाही एक मुख्यमंत्री न्यायासाठी रस्त्यावर उतरतात, यास काय म्हणावे? हे एक निव्वळ ढोंग असून, सामान्य जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकण्याचा प्रकार आहे. झालेल्या प्रकरणाबद्दल जनतेमध्ये भ्रमाचे वातावरण निर्माण करून उपरोक्त प्रकरण दडपण्याचा हेतू जनतेच्या लक्षात आला आहे. अशा गंभीर प्रकरणातही एका मुख्यमंत्र्याच्या या भूमिकेने राजकीय क्षेत्रामध्ये अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
 
 
 
Kolkata-Rape-TMC एवढे गंभीर प्रकरण घडूनही ममता बॅनर्जी राजकारण करू पाहत आहे. सदर प्रकरणामध्ये भाजपाचा हात असल्याचा जावई शोध लावून त्यांनी यामधून हात झटकण्याचा प्रयत्न केला. अशा विभत्स आणि राक्षसी कृत्यावर जर एक मुख्यमंत्री पांघरून घालून आपल्या चेल्याचपाट्यांची पाठराखण करीत असेल तर राजकीय क्षेत्र किती बरबटलेले आहे, याचा सामान्य नागरिक कधी विचार करतील? कायदे पायदळी तुडवून आपल्या राजकीय स्वार्थासाठी सामान्य नागरिकांच्या जीवाचीही पर्वा न करणारे राजकारणी लोकशाहीचीही खुलेआम हत्या करीत असतात. हुकूमशाहीकडे वळणारे हे पश्चिम बंगालचे राजकारण भविष्यामध्ये देशासाठीही घातक ठरू शकते. याची जेव्हा जाणीव होईल, त्यावेळी कदाचित बराच वेळ झालेला असेल. त्यामुळे केंद्र सरकारने पश्चिम बंगालचे ममता बॅनर्जी यांचे सरकार तातडीने बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावणे, हाच त्यावरील एक रामबाण उपाय आहे. सामान्य जनतेच्या मनातही तेच आहे.
९८८१७१७८५६
Powered By Sangraha 9.0