उबाठाचे आंदोलन म्हणजे राजकीय गिधाडवृत्ती

28 Aug 2024 20:38:34
- आशिष शेलार यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई, 
एखादी व्यक्ती मरते का आणि आपल्याला खायला मिळते का... याची वाट पाहत गिधाडे बसलेली असतात, तशीच राजकीय गिधाडी वृत्ती उबाठाची आहे. आपण स्वत: काही करायचे नाही, पण एखादी घटना, दुर्घटना घडली की, त्यावर राजकीय पोळी काम उबाठा करते, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार Ashish Shelar अ‍ॅड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी मालवणमध्ये ठाकरे गट आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आले, त्यानंतर Ashish Shelar शेलार यांनी मुंबई भाजपा कार्यालयात पत्रपरिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
 
 
Ashish Shelar
 
शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, ही घटना दुदैवी, वेदनादायी, क्लेशदायी आणि मनात संताप निर्माण करणारी आहे. हा एक अपघात होता. याबाबत सरकारने आपली बाजू मांडली असली तरी, शिवप्रेमी म्हणून या दुदैवी घटनेबाबत सरकारच्यावतीने मी माफी मागितली आहे. आजही माफी मागतो, या प्रकरणी दोषी कोण हे ठरेल, सर्व चौकशा होतील आणि कारवाई सुद्धा होईल, यात सरकार कुणालाही घालणार नाही. पुन्हा उत्तम दर्जाचे स्मारक उभे करण्यात येईल, असे सांगून शेलार म्हणाले की, लोकशाही आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. या पुतळ्याबाबत आज जे आरोप करीत आहेत, त्यांनी पुतळा उभा राहिल्यानंतर आणि उभा राहत असताना कधीही काही सूचना केल्या नाहीत तसेच कधी तो पुतळा बघायला अथवा अभिवादन करायला गेले मात्र, दुर्घटना घडताच गिधाडासारखे यावर राजकारण करीत आहेत. उद्धव ठाकरे यांचा हा औरंगजेब फॅन क्लब आहे. ठाकरे यांनी महाराष्ट्राची अस्मिता आणि प्रतिकांचा अपमान वारंवार केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंढरपूरला गेले, पण विठोबाच्या पायाला हात लावला नाही, तुळशी माळ गळ्यात घातली नाही. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ सोडला तर कधीच ६ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला चैत्यभूमीवर गेले नाहीत. ही यांची औरंगजेब फॅन क्लब वृत्ती आहे, असा घणाघात Ashish Shelar शेलार यांनी केला.
Powered By Sangraha 9.0