मुंबईत १ सप्टेंबरला मविआचे आंदोलन

28 Aug 2024 20:57:09
मुंबई, 
Mahavikas Aghadi : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी येत्या रविवारी मुंबईत महाविकास आघाडीकडून मारो’ आंदोलन करणार असल्याची घोषणा उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले या महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत संयुक्त पत्रपरिषद झाली. यात ठाकरे यांनी ही घोषणा केली.
 

Mahavikas Aghadi 
 
Mahavikas Aghadi महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते रविवारी सकाळी ११ वाजता हुतात्मा चौकात जमतील. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान हुतात्म्यांना वंदन केल्यानंतर गेट ऑफ इंडियाच्या दिशेनं मोर्चा काढला जाईल. गेट ऑफ इंडियावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले जाईल. तिथेच या सरकारला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येईल, असे ठाकरे यांनी जाहीर केले.

भ्रष्टाचार टोकाला पोहोचला : शरद पवार
आज कोणी म्हणत आहेत, वार्‍याचा वेग होता. खर तर त्या भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचला आहे, हे निदर्शनास आले. कुठे भ्रष्टाचाराची भूमिका घेऊ नये, याचे तारतम्य सरकारला नाही, असे पुतळा दुर्घटनेवर शरद पवार म्हणाले. याप्रकरणी लोकांची तीव्र भावना झाली आहे. त्यासाठीच आम्ही लोकांना आवाहन करीत आहोत. येत्या रविवारी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल, असेही पवार म्हणाले.
Powered By Sangraha 9.0