नारायणपूरमध्ये चकमकीत तीन नक्षलवादी ठार!

29 Aug 2024 12:46:18

krida
 
नारायणपूर,
Naxalites killed in Narayanpur छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवर ही चकमक सुरू आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील माड जंगलात सकाळी आठच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. सध्या दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलांचे संयुक्त पथक सहभागी आहे. या गोळीबारात कोणत्याही जवानाची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. गुरुवारी सकाळी सैनिकांचे पथक शोधासाठी निघाले होते, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
 हेही वाचा : भीषण ! द्वारका जलमग्न ...मगरींचा सुळसुळाट !
 
Powered By Sangraha 9.0