गौरव सेवेचा, सन्मान शिक्षकांचा!

29 Aug 2024 09:49:34
वेध 
 
honor to teachers in gadachiroli काही शिक्षक शाळेचा गोठा करतात तर काही शिक्षक आपल्या निष्काम र्काच्या बळावर गोठ्याची शाळा करतात. सध्याच्या व्यावसाकि शिक्षण प्रणालीत शिक्षणाचा बाजार मांडलेल्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे हाडाचे शिक्षक आजही महाराष्ट्रात आहेत, हे बघून ऊर भरून येतो. घरावर तुळशीपत्र ठेवून विद्यादान करणारे शिक्षक आता केवळ थोडेच उरले आहेत, हे अगदी ठामपणे सांगता येईल. कष्ट उपसण्याची तयारी, गरीब मुलांच्या शिक्षणाची धडपड, चांगले संस्कार आणि गरिबांच्या मुलांना मुख् प्रवाहात आणण्यासाठी ज्यांनी गुरू म्हणून आपले कर्तव्य चोख बजाविले आहे, त्या सेवेचा गौरव व त्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या भारत सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन. महाराष्ट्रातील शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्ग जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मांतय्या बेडके व कोल्हापूर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सागर बगाडे यांचा समावेश आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे होणार्‍या शिक्षक दिनाच्या र्काक्रमात दोन्ही कर्तबगार शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे. त्या शिक्षकांना प्रत्येकी ५० हजार रुपये रोख व रजत पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही बाब संपूर्ण महाराष्ट्राकरिता गौरवाची आहे.
 
 
bedke
 
 
एका निष्काम सेवेचा हा गौरव असून महाराष्ट्रात मांतय्या बेडके व सागर बगाडे यांच्यासारख्या हाडाच्या शिक्षकांची खरंच नितांत गरज आहे. एकीकडे बदलापूरसारख्या शहरातील शाळेत शिकविणार्‍या चिमुकल्या मुलींची छेड काढली जाते, त्या शिक्षकाच्या किळसवाण्या कृत्याच्या निषेध नोंदविण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरावे लागते. honor to teachers in gadachiroli संपूर्ण शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचा प्रयत्न करणार्‍या अशा शिक्षकाविरुद्ध समाजात संतापाची लाट निर्माण होते. तर, दुसरीकडे मात्र पुरोगामी महाराष्ट्रातील गरिबांच्या मुलांसाठी झटणारे शिक्षकही महाराष्ट्राच्या मातीतच जन्माला आले आहेत, हे विसरून चालणार नाही. विद्यादानाचे र्का शिक्षक त्यांच्या शिष्यांसोबतच गैरवर्तन करीत असतील तर त्यांना धडा शिकवायला आपण रस्त्यावर उतरतो आणि अशा शिक्षकांवर निश्चितच कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, जे शिक्षक प्रामाणिकपणे शासन दरबारी सेवा देऊन समाजाला दिशा देण्यासाठी व सदृढ समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, त्या प्रामाणिक शिक्षकांचा गौरव केवळ सरकारनेच नाही तर समाजानेसुद्धा गरज आहे. गडचिरोलीसारख दुर्गम भागात जिथे जायला रस्ते नाहीत, कुठल्याही सुखसोयी नाहीत अशा जाजावंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत र्कारत मांतय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला, ही बाब गडचिरोलीकरांसाठी गौरवाची आहे. (honor to teachers in gadachiroli) ६०० लोकसंखेचे गाव असलेल्या एटापल्ली तालुक्यातील जाजावंडीत पहिली ते चौथीपर्यंत पटावर फक्त सात विद्यार्थी होते. त्यातील विद्यार्थी शाळेत यायचे तर तीन विद्यार्थ्यांचा पत्ताच नव्हता. अशा परिस्थितीत मांतय्या बेडके यांनी २०१० ते २०११ च्या दरम्यान या शाळेत आपले पाऊल ठेवले आणि आज त्या शाळेत १४० विद्यार्थी आपल्या आयुष्याचा कित्ता गिरवायला सज्ज झाले आहेत. शाळेत जिथे विद्यार्थीच यायला तयार नसतात त्या शाळेच्या गुणवत्तेबद्दल बोलायलाच नको; मात्र माझीही इतर शाळांतील विद्यार्थ्यापेक्षा कमी राहू नये, असा चंग बांधलेल्या मांतय्या बेडकेंनी शाळेत विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली आणि सरकारलादेखील आपल्या शाळेकडे लक्ष देण्याकरिता भुरळ घातली.
 
 
शाळेच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर बेडके यांनी विद्यार्थ्यांच्या निरक्षर पालकांनाही साक्षर करण्याचा वसा घेतला व गावातील १५० प्रौढांना साक्षर केले. (honor to teachers in gadachiroli) शिक्षणाचे महत्त्व गावकर्‍यांना पटवून देण्यासोबतच यांनी शाळाबाह्य ३० मुलांना दत्तक घेऊन त्या मुलांच्या निवासाची व जेवणाची सोयदेखील शाळेच्या परिसरात करून त्या मुलांना शिकविण्यासाठी धडपड चालविली आहे. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख् कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या या सेवेचा सन्मान जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याचे बोलून बेडके शिक्षकाची जणू थोपटली. राज्यातल्या दोन्ही शिक्षकांना भारत सरकार शिक्षक दिनी गौरविणार आहे. येत्या काळात केवळ दोनच नाही तर प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षक गौरवास पात्र ठरतील, असा आशावाद व्यक्त करायला हरकत नाही.
 
 
नंदकिशोर काथवटे
९९२२९९९५८८ 
Powered By Sangraha 9.0