‘मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना...’

03 Aug 2024 16:56:17
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या राजकारणातील काळात तळागाळातले शिवसेनेचे कार्यकर्ते स्वतःच म्हणायचे, उद्धव साहेब साधासुधा, सोज्वळ माणूस आहे. राजसाहेबांसारखा ‘रफ अ‍ॅण्ड टफ’ नाही. हा शिवसेनेच्या पठडीत बसणारा नाही. मुळात हा शिवसेनेसाठी बनलाच नाही वगैरे वगैरे... यावेळी अचानक उद्धव ठाकरे यांची तू-ता ची टपोरी भाषा ऐकली आणि साधासुधा, सोज्वळ माणूस समजणार्‍या कार्यकर्त्यांचा गैरसमज दूर झाला. उद्धव पहिलेपासून आतल्या गाठीचाच माणूस, कोल्ड ब्लडेड मर्डरसारखी खुनशी वृत्ती तर त्याने आधीच आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात दाखविलीच आहे. याचा अनुभव तर घरच्यांना, सख्ख्या भावाला, चुलत भावाला कधीचाच आलाय्... डाव धरून ठेवणे, मग काटा काढणे वगैरे सर्व प्रकार करून मोकळा झालेल्या ठाकरेंबद्दल तरीही कार्यकर्ते आजही संभ्रमातच होते. लोकांना, कार्यकर्त्यांना सतत वाटायचं राऊत काय भाषा बोलतो! महिलांविषयी अपशब्द वापरतो, महिलांचा अपमान करतो, वृत्तवाहिन्यांच्या कॅमेर्‍यांसमोर अश्लील भाष्य करतो आणि आमचे उद्धवसाहेब हे कसे सहन करून घेतात? राऊताला का आवरत नाहीत? भाषेवर अंकुश का लावत नाहीत? या सगळ्याचं उत्तर आज कार्यकर्ते आणि अवघ्या महाराष्ट्राला मिळालं असेल. आता मालक जी कृती करेल, ज्या भाषेचा करेल त्याचंच अनुकरण खालचे कार्यकर्ते करतीलच नाही का...
 
 
devendrafadnavis-pti
 
राज्याच्या मुख्यमंत्र्यांसारख्या संवैधानिकपदावर राहिलेला माणूस आपल्या लायकीचे प्रदर्शन मुख्यमंत्रिपदावर असतानापासून तर आजवर सातत्याने करत आला आहे. बरं यांची, यांच्या पक्षाची आणि यांनी पोसून ठेवलेल्या कार्यकर्ता नावाच्या टोळीची संस्कृती, भाषा ही नेहमी टपोरीबाजच, गुंडगिरीची, भाईगिरीचीच राहिली आहे. बरं, ही सगळी तोंडावाटे बाहेर आगपाखड कशासाठी आहे, ही उद्विग्नता कशाची आहे? कारण फडणवीसांनी यांचे वसुलीचे धंदे बंद केले, मातोश्रीवर जाणारे खोके बंद केले. हे अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे.
 
 
‘‘तू राहशील, नाही तर मी !’’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी केले फडणवीसांना लक्ष्य. शरद पवार फडणवीसांना लक्ष्य करतात. मराठा आंदोलक जरांगे फडणवीसांना लक्ष्य करतात. फडणवीसांवर तोंडसुख घेत असते. याचा सरळसरळ अर्थ असा की, फडणवीसांच्या नावानं या सगळ्यांची टरकते. फडणवीसांची रणनीती, फडणवीसांची व्यूहरचना, निवडणूक तंत्र ज्याने दोन दोन वेळा राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये यांना अस्मान दाखवले, सत्तेतून पायउतार करून आपल्या निवडणूक कौशल्याचे अनिल देशमुख, नवाब मलिकांना जागा दाखवली. सत्तेत नसताना, हातात यंत्रणा नसताना Devendra Fadnavis फडणवीसांनी पळता भुई थोडी केली. यांच्या पक्षाची, यांची दाणादाण उडविली. त्यामुळे यांना केवळ फडणवीस खुपतात. आता काय नवं सोंगं समोर आणलं, अनिल देशमुखांना शपथपत्र लिहून देण्यास फडणवीसांनी सांगितलं म्हणे. मूर्खांचा बाजार भरलाय् मविआमध्ये. जेव्हा मागितलं तेव्हा ते शपथपत्र ठेवून घ्यायचे होते, उघड करायचे होते, फडणवीसांचं षडयंत्र उघडं पाडायचं होतं. यातलं काहीएक केलं नाही आणि आता छाती बडवताना दिसत आहेत. महत्त्वाचं म्हणजे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना तुरुंगात डांबण्याचा डाव फडणवीसांनी रचला होता. होय रचला होता, पण नेमकं कोणत्या प्रकरणात जरा सविस्तरपणे जनतेला सांगा ना. काय म्हणून शपथपत्र करून मागत होते फडणवीस? याबाबत काही सांगताना देशमुख दिसत नाहीत. ठाकरेदेखील सांगत आदित्यचं एकदा आपणच समजून घेऊन दिशा सलियान प्रकरण अंगलट आलं आहे त्याच्या. पण उद्धव ठाकरेंविरोधात कोणत्या प्रकरणात अडकविण्यासाठी देशमुखांवर दबाव आणला जात होता? याचा खुलासा केला पाहिजे ना की निव्वळ खोटं नॅरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न तर नाही ना. आजवर झोपलेले होते; आज अचानक जाग आल्याने प्रश्न पडतो.
 
 
Devendra Fadnavis : मुळात तू राहशील, तर मी, असे नाही, पण तू नाही राहशील, असं आव्हान काही लोकांनी यापूर्वी फडणवीसांना दिलं होतं. अनेक षडयंत्र करण्यात आले. फोन टॅपिंग प्रकरणात अडकविण्याचा डाव जो रचला गेला होता, एक छायाचित्र दाखवून ड्रग्स माफियासोबत संबंध असल्याचा प्रयत्न झाला; एवढंच नव्हे फडणवीस फसत नाहीत म्हणून, एका डिझायनर उच्चशिक्षित मुलीद्वारे त्यांच्या लाच देऊन फसविण्याचा प्रयत्न केला गेला. पण यांच्या कुठल्याही चक्रव्यूहात फडणवीस अडकले नाहीत किंवा षडयंत्राला बळी पडले नाहीत. हे त्यांचे कौशल्य आहे. मुलाबाळापर्यंत, घरापर्यंत येण्याची महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. फडणवीसांमुळे वातावरण खराब झाल्याची टिमकी वाजविली जात आहे. नवाब मलिकांनी फडणवीसांच्या पत्नीचा फोटो भर पत्रकार परिषदेत दाखवून ड्रग्स माफियांसोबत संबंध असल्याचे डिझायनर उच्चशिक्षित मुलीद्वारे फसवणुकीच्या प्रकारावर मविआ नेत्यांनी उचकटलेल्या तोंडांना घरापर्यंत पोहोचणे नाही तर काय म्हणावे? आणि हे लोकं आज महाराष्ट्राच्या संस्कृती, घरादाराच्या टिमक्या वाजत आहेत, याचे आश्चर्य वाटते.
 
 
Devendra Fadnavis : मुळात आव्हानं देणार्‍यांनी आपली लायकी ओळखून आव्हानं द्यावीत. मुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी केल्यानंतर बापलेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कित्येक वेळा आव्हान दिले, राजीनामा द्या समोर जा, मी ठाण्यात येऊन लढतो नाहीतर तुम्ही वरळीतून लढा वगैरे वगैरे... लोकसभेची निवडणूक लागली आणि शिंदेंच्या पुत्राच्या विरोधात निवडणूक लढायला कोणी सापडत नव्हते तर नवख्या महिलेला बळीचा बकरा बनवले. जेव्हा खरोखर आव्हान पेलण्याची वेळ आली तेव्हा मैदान सोडून पळून जाणारे कोणत्या तोंडाने पुन्हा आव्हान देत असावेत, हे निर्लज्ज आपली लायकी आणि पायरी सांभाळून बोललं पाहिजे, नाहीतर नादी लागणार्‍यांना फडणवीसांनी ‘‘मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, पहले ही कई फसानो का रुख मोड़ चुका हूँ मैं..’’ असा शायरीतून इशारा दिलाच आहे.
 
९२७०३३३८८६
Powered By Sangraha 9.0