नागपूर,
Sri Chakradhar Swami महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन राजशिष्टाचारानुसार दिल्लीतही साजरा व्हावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे, यांनी शासनाला केली आहे. महाराष्ट्र शासनाने यंदापासून राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्ती जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतच्या परिपत्रकात 'भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिना'चा समावेश केला. शासनस्तरावर राष्ट्रीय राजधानीत प्रथमच होत असलेला कार्यक्रम भव्य स्वरुपात साजरा व्हावा, अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.
भाद्रपद शु. द्वितीया हा दिवस देशातील दीड कोटी आणि जगभरातील कोट्यावधी महानुभावांना दिवाळीपेक्षाही मोठा उत्सव आहे. श्रीचक्रधर स्वामींनी सत्य, अहिंसा, मानवता, समानता ही वैश्विक मूल्ये समाजाला दिली.Sri Chakradhar Swami श्रीचक्रधर स्वामींचे तत्वज्ञान, मानवतावादी कार्य, अलौकिक साहित्य आणि सामाजिक योगदानाची माहिती देशभरात करुन देता येईल. येत्या ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात अवतारदिनानिमित्त विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे. या कार्यक्रमात देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह इतरही मान्यवर मंडळींना प्रशासनाने निमंत्रित करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सौजन्य:प्रत्युष दुबे,संपर्क मित्र