पालघरचे आर्थिक चित्र बदलणार : पंतप्रधान

    दिनांक :30-Aug-2024
Total Views |
- वाढवण बंदराची पायाभरणी व १,५६३ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

पालघर, 
देशाच्या व विकासात मासेमारंचे मोठे योगदान आहे. Vadhvan Port  वाढवण बंदर हा जगातील सर्वांत खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे. आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला जाणार असून, यामुळे येथे नवनवीन व्यापार सुरू होतील. या बंदराचा लाभ महाराष्ट्रासोबतच या भागातील स्थानिकांना त्यांच्या पुढील पिढ्यांना होणार आहे, असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
 
 
Palghar Economic
 
७६,२०० कोटी रुपये खर्चाच्या Vadhvan Port वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच १,५६३ कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पाचे व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील सिडको मैदानात आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय बंदर विकास, जहाज व जलवाहतूक सर्वानंद सोनोवाल आदी उपस्थित होते.
मराठी भाषेतून भाषणाची सुरुवात
सर्व लाडक्या बहिणी व भावांना तुमच्या या सेवकांचा नमस्कार, अशा शब्दांत मराठी भाषेतून संवाद साधत मोदी यांनी संत सेनानी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंदन करून भाषणाची सुरुवात केली. दिवस विकसित महाराष्ट्र-विकसित भारत संकल्पनेसाठी महत्त्वाचा आहे. राज्याच्या विकास यात्रेतील हा एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, महाराष्ट्राला एक समृद्ध व संसाधनयुक्त समुद्रकिनारा लाभला आहे. या किनार्‍यावरून आंतरराष्ट्रीय व्यापार होत असून, यामुळे भविष्यात मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळेच ७६,२०० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे देशातील सर्वांत मोठे वाढवणमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला. देशभरातील सर्वच बंदरांमधून जेवढी कंटेनर वाहतूक होते, त्यापेक्षा जास्त कंटेनर वाहतूक एकट्या वाढवण बंदरातून होणार आहे. हे Vadhvan Port  बंदर देशाच्या व्यापार व औद्योगिक प्रगतीचे मोठे केंद्र बनणार आहे.
१२ लाख रोजगार निर्माण होणार
मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या संकल्पनांचा लाभ देशाला होत असून, यात महाराष्ट्राचे फार मोठे आहे. वाढवण बंदरामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक या परिसरात होणार असून, सुमारे १२ लाख रोजगार निर्माण होणार आहेत, असेही मोदी यांनी सांगितले.