ब्राझीलने ब्लॉक केले ‘एक्स’

31 Aug 2024 20:41:30
- स्थानिक प्रतिनिधीचे नाव देण्यास कंपनीचा नकार
 
साओ पावलो, 
Brazil blocked 'X' : ब्राझीलने एलन मस्क यांच्या समाज माध्यम मंच एक्सला ब्लॉक केले आहे. एलन मस्क कायदेशीर प्रतिनिधीचे नाव देऊ न शकल्याने मोबाईल तसेच संगणकावरील एक्सची सेवा ब्लॉक करण्याची कारवाई करण्यात आली. भाषण स्वातंत्र्य, अतिउजव्या विचारसरणीची खाती आणि चुकीच्या माहितीच्या मुद्यावर मस्क आणि ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमध्ये महिनाभर चाललेल्या संघर्षानंतर शुक्रवारी न्या. अलेक्झांड्रे डी मोरेस यांनी आदेश दिल्यानंतर या कारवाईला सुरुवात झाली.
 
 
Brazil blocked 'X'
 
Brazil blocked 'X' : एक्सला ब्लॉक करण्यासाठी ब्राझीलमधील दूरसंचार नियामक, अनाटेलने इंटरनेट सेवा प्रदात्यांना समाज माध्यम मंचावर वापरकर्त्यांचा प्रवेश निलंबित करण्यास त्यानंतर शनिवारी सकाळपासून मोठ्या सेवादात्यांनी एक्सला ब्लॉक करणे सुरू केले. ब्राझीलमध्ये एक्सचा मागील महिन्यापासून कायदेशीर प्रतिनिधी नाही. ब्राझीलमध्ये कार्यरत विदेशी कंपन्यांना कायदेशीर निर्णयाबद्दल कोणतीही सूचना देण्यासाठी तसेच कोणतत्याही आवश्यक कारवाईसाठी स्थानिक प्रतिनिधी आवश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0