आंदोलनं...

    दिनांक :31-Aug-2024
Total Views |
वेध
- महेंद्र आकांत
सध्या महाराष्ट्र राज्यात Movement आंदोलन... आंदोलन... नावाचा सुरू आहे. काहीही खुट वाजलं... काहीही अनुचित घटना घडली तरी विरोधक आंदोलनाचा बडगा उगारत आहेत. एका प्रकरणाची आग पेटविली जाते, त्याचा धूर चारही दिशांना पसरविण्याचा प्रयत्न केला जातो न् जातो तोच दुसरी एखादी नैसर्गिक आपत्ती का होईना घटना घडते आणि पहिली आग शांत होऊन दुसरा आगडोंब उठविला जातो. साधारणत: आल्या रे आल्या की सत्तापक्षाला अडचणीत पकडण्यासाठी विरोधकांकडून आंदोलन, नारे निदर्शने, बंद आदी अनेक हत्यारे उपसली जातात. बदलापूरमध्ये एक घटना घडली. निश्चितच या घटनेचा निषेध व्हावा तितका थोडाच आहे. अशा घटनांमधील अपराध्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे, ही तर सर्वसामान्य लोकांचीही मागणी राहू शकते. ज्यांना मुली आहे ते तर नराधमांना ठेचून काढा, अशीही मागणी करू शकतात. मात्र, अशा घटनांचे राजकीय भांडवल न करता सामोपचाराने, सर्वसंमतीने त्यावर उपाययोजना केल्या पाहिजे.
 
 
andolan
 
Movement : हे न करता विरोधक आंदोलनाचा आगडोंब उसळवितात. या बदलापूर घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्र बंदचे आवाहन करून विरोधातील महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर सरकारविरोधी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री लाडकी योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग सत्तापक्षाकडे वळण्याचा अंदाज घेऊन त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव होता. लहान मुलीच सुरक्षित नाही तिथे लाडकी बहीण काय घेऊन बसलात, असे नॅरेटिव्हही तयार झाले होते. मात्र, न्यायालयाने हा बंद अवैध ठरवून त्यांचा डावच उधळून लावला. तेव्हापासून विरोधक चांगलेच चवताळले आहेत. आता त्यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पुतळ्याचे प्रकरण लागले आहे. तो पुतळा उभारण्याचे काम नौदलाने केले. मात्र, त्याचे खापर महाराष्ट्र शासनावर फोडले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या पुतळ्याचे लोकार्पण झाल्यामुळे या घटनेची नैतिक जबाबदारी मोदी यांनी घ्यावी आणि देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभेच्या कार्यक्रम झाला असला, तरी इकडे महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटून विरोधक आंदोलनाचे हत्यार उपसून कामाला लागले आहेत. त्या तारखा जाहीर झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना अजूनही आंदोलनापासून फुरसत मिळालेली नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने हे आंदोलन हाती घेतले जात आहे. अजून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. एकूणच परिस्थिती पाहता महायुती सरकारनेही सावध व गरज पडल्यास आक्रमक भूमिका घेणे गरजेचे आहे.
 
 
Movement : लोकसभा निवडणुकीच्या आधीही विरोधकांकडून देशभर असेच आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने शेतकरी आंदोलन, शाहीनबाग आंदोलनाचा उल्लेख करता येईल. शेतकर्‍यांच्या हिताचे कायदे असतानाही त्याला विरोध केला गेला. एवढेच नव्हे, तर ठिय्या आंदोलन करून सर्वसामान्यांचे हाल बेहाल करून टाकले शाहीनबाग आंदोलनामुळे तर देशात जातीयवादाचा मोठा आगडोंब उसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यापर्यंत आंदोलनकर्त्यांनी मजल मारली होती. साधारणत: माझा असा अनुभव आहे की, देशात, राज्यात जेव्हा निवडणुका अपेक्षित असतात तेव्हा विरोधकांकडून आंदोलनाचे शस्त्र पाजळले जात असते. त्यात सर्वसामान्यांच्या संपत्तीची मोठ्या प्रमाणावर हानी होत असते, कधी तर अशी आंदोलने जीवावरही बेतत असतात. मात्र, त्यांचे कोणाला काही सोयरसुतक नसते. निव्वळ आपली पोळी भाजून घेणे, हाच त्या मागचा हेतू असतो. लोकांमध्ये सत्तापक्षाविरुद्ध जहर पसरविणे हाच त्या मागचा प्रमुख उद्देश असतो, सत्तापक्षाला सत्तेवरून हुसकावून लावून सत्ता बळकावणे, अशी विरोधकांची अपेक्षा असते. येनकेनप्रकारेण सत्ता बळकाविणे, हे विरोधकांचे उद्दिष्ट असते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी, त्यांच्या समस्या; अडचणींशी काहीही देणे घेणे नसते. बरं, हे पुन्हा सत्तेत आले तर जनसामान्यांसाठी काही करतात का? तर उत्तर आहे नाही... मात्र, आंदोलनाचा दाह शांत झालेला असतो. एवढेच... 
 
- ९८८१७१७८०३