अमेरिकी-इराकच्या कारवाईत इसिसचे १५ अतिरेकी ठार

31 Aug 2024 20:27:42
- पश्चिम वाळवंटात कारवाई
 
बगदाद, 
US-Iraq operation : इराकने केलेल्या कारवाईत सहभागी अमेरिकी लष्कराने इराकच्या पश्चिम भागात इसिसच्या १५ दहशतवाद्यांचा खात्मा केला, अशी माहिती अमेरिकी लष्कराने शनिवारी दिली. मागील काही वर्षांपासून इराक आणि सीरियातील स्वयंघोषित खलिफतच्या दहशतवाद्यांना अमेरिकी मागे ढकलत असून, अमेरिकेचे लष्कर सातत्याने इसिससोबत लढत आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाईतील मृत्युमुखींची संख्या प्रत्यक्षात खूप जास्त असू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली.
 
 
US-Iraq operation
 
US-Iraq operation : अनबर वाळवंटात ही कारवाई करण्यात आली, असे इराकच्या लष्कराने सांगितले. इसिसचे दहशतवादी विविध शस्त्रे, ग्रेनेड्स आणि आत्मघाती स्फोटकांचे पट्टे घालून लढत होते, असा दावा अमेरिकी लष्कराने केला आहे. अमेरिकेच्या विरोधातील कट रचण्याची, परत संघटन उभे करण्याची क्षमता, इराकी तसेच अमेरिकी व सहकारी देशांमधील नागरिकांवरील हल्ल्यांचा कट उधळण्यासाठी ही कारवाई आली, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले करण्यात आले, त्यापाठोपाठ हवेतून तुकड्या उतरवण्यात आल्या, अशी माहिती इराकच्या लष्कराने दिली.
 
 
सात अमेरिकी सैनिक जखमी
इराक आणि अमेरिकेने इसिसवर केलेल्या संयुक्त कारवाईत अमेरिकी लष्कराचे सात जवान जखमी झाले. कारवाईत पाच जण, तर दोन सैनिक पडल्याने जखमी झाले, अशी अमेरिकेच्या अधिकार्‍याने दिली.
Powered By Sangraha 9.0