घरोघरी तिरंगा अभियान आता लोकचळवळ : मुख्यमंत्री

    दिनांक :09-Aug-2024
Total Views |
- क्रांती मैदानातून राज्यस्तरीय शुभारंभ

मुंबई,
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सतत जाणीव करेल आणि राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल. आता हे अभियान लोकचळवळ बनले आहे, असे प्रतिपादन Chief Minister Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
 
 
Chief Minister Eknath Shinde
 
ऑगस्ट क्रांती आज घरोघरी तिरंगा अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. Chief Minister Eknath Shinde मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत १९४२ रोजी याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून ‘चले जाव’चा नारा देण्यात आला. त्यानंतर हे आंदोलन अधिक व्यापक झाले. लाखो जणांनी आपले प्राण या देशासाठी अर्पण केले. या हौतात्म्याच्या बलिदानाची आठवण आणि या वीरांप्रति कृतज्ञता म्हणून आपण देशभरात आपल्या राष्ट्रध्वजाविषयी नव्या पिढीत आत्मीयता निर्माण करीत आहोत.
 
 
यावर्षीही राज्यातील अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे. देशप्रेमाची भावना त्याद्वारे जागवली जाणार आहे. घर, दुकाने, आस्थापनांवरही तिरंगा फडकवला जाणार आहे. आपल्या राष्ट्र ध्वजातील केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. नव्या पिढीत हीच प्रेरणा आणि विश्वास निर्माण करण्याचे काम हे अभियान करणार आहे. अधिक उत्साहात आणि जल्लोषात हे अभियान साजरे करून राज्यभरात देशभक्तीचा मळा फुलणार आहे आणि देशप्रेमाचा सुगंध वाहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
 
रॅली, पदयात्रा, तिरंगा सेल्फी, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार अशा माध्यमातून अभियान साजरे करायचे आहे. सर्वांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात विकास आणि कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करण्याचे काम राज्य सरकार करीत असल्याचे Chief Minister Eknath Shinde मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.