हरित नोकर्‍यांचा शाश्वत पर्याय

    दिनांक :01-Sep-2024
Total Views |
गाथा पर्यावरणाची
- मिलिंद बेंडाळेे
हरित नोकर्‍या देशासाठी खूप महत्त्वाच्या असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या नोकर्‍या हवामान बदलाशी लढण्यास मदत करतील. जागतिक स्तरावर ‘ग्रीन हायड्रोजन मिशन’ची स्थापना करायची आहे आणि त्या दिशेने काम सुरू आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात हरित नोकर्‍या वाढण्याची दाट शक्यता आहे. झाल्यास देशातील तरुण या क्षेत्रात आघाडीवर असतील. पृथ्वीवर वेगाने हवामान बदल होत आहे. पाणी आणि जंगले यासारखी संसाधने कमी होत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणार्‍या अशा कामांची नितांत गरज आहे. त्यांना ‘ग्रीन जॉब्स’ म्हणतात. 'Green Jobs' ‘ग्रीन जॉब्स’ अशा नोकर्‍या आहेत, ज्या आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यास किंवा सुधारण्यास मदत करतात. त्यांच्या पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी होत नाही. कमी पाणी वापरून उत्पादन करणे किंवा कचरा कमी करणे, ‘इको-फ्रेंडली’ इमारती बांधणे किंवा प्रदूषणमुक्त वाहने बनविण्याचे मार्ग शोधणे असे ते पर्याय आहेत. जलविद्युत, सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने यासारख्या क्षेत्रातील नोकर्‍यांना ‘ग्रीन जॉब्स’ म्हणतात. कचरा आणि प्रदूषण कमी करणे तसेच कमी हानिकारक ठरणारे पदार्थ निर्माण करणार्‍या कामाच्या पद्धतींना प्रोत्साहन देणे हा ‘ग्रीन जॉब्स’चा उद्देश आहे. या माध्यमातून जंगल, नद्या, पर्वत या नैसर्गिक गोष्टींचे संरक्षण केले जाते. याशिवाय वाढती उष्णता, बदलत्या पावसाचे स्वरूप यासारख्या हवामानातील बदलांना सामोरे जाण्यासही त्या मदत करतात.
 
 
green-jobs
 
एखादी कंपनी सौर ऊर्जा पॅनेल बनवते. हे फलक घर कारखान्यांमध्ये बसवून वीज निर्मिती केली जाते. या कंपनीत काम करणारे लोक हरित नोकर्‍यांमध्ये गुंतले आहेत. नवे पर्याय कोळसा किंवा पेट्रोलसारख्या इंधनाची जागा घेऊ शकतील आणि प्रदूषण कमी करू शकतील अशी उत्पादने निर्माण करत आहेत. 'Green Jobs' ‘ग्रीन जॉब’चे विविध प्रकार आहेत; ज्यामध्ये सर्व प्रकारचे कौशल्य आणि आवड असलेले लोक काम करू अक्षय ऊर्जेमध्ये काम करणारे लोक वारा, सूर्य आणि पाणी यासारखे स्वच्छ ऊर्जा स्त्रोत वापरण्याचे मार्ग शोधतात. कमीत कमी ऊर्जेचा वापर करून जास्तीत जास्त काम करण्याचे मार्ग यामधून सापडतात. यामध्ये इमारतींमध्ये वीज वाचवण्याचे मार्ग समजावून सांगणारे लोक, पर्यावरणपूरक घरे बांधणारे वास्तुविशारद आणि ऊर्जा-बचत उत्पादने बनवणार्‍या डिझाइनर्सचा समावेश आहे. पर्यावरण व्यवस्थापनामध्ये प्राणी आणि नैसर्गिक गोष्टींचे संरक्षण करणे समाविष्ट आहे. वन्य प्राण्यांबद्दल माहिती असलेले, जंगलांची काळजी घेणारे आणि पर्यावरणविषयक सल्ला देणारे लोक येथे येतात. त्याचप्रमाणे, कृषी क्षेत्रात अशा पद्धती आढळतात, ज्याद्वारे शेती आणि अन्न उत्पादन पर्यावरणासाठी चांगले आहे. हे लोक सेंद्रिय शेती करतात, शेतकर्‍यांना सल्ला देतात आणि अन्नपदार्थ वाचवण्याचे मार्ग शोधतात.
 
 
ट्रान्सपोर्टेशन’मध्ये असे काम केले जाते; ज्यामुळे प्रदूषण कमी होते. यामध्ये इलेक्ट्रिक वाहने बनवणे, सायकल चालविण्यासाठी जागा निर्माण करणे, उत्तम वाहतूक व्यवस्था निर्माण करणे यांचा समावेश आहे. भारताने २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यामुळे हरित नोकर्‍यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. अनेक कंपन्या प्रदूषण कमी करण्यासाठी नवीन प्रकारची ऊर्जा शोधण्याचे काम करत आहेत. या कंपन्यांना पर्यावरणीय कौशल्य असलेल्या लोकांची गरज आहे. ‘स्यू’, ‘एनआरडीसी इंडिया’ आणि 'Green Jobs' ‘स्किल कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स’ यांच्या संयुक्त अभ्यासानुसार, २०२२ मध्ये भारतातील सौर आणि पवन ऊर्जा क्षेत्रात ५२ हजार ७०० नवीन कामगार घेतले गेले. २०२१-२२ च्या तुलनेत ते आठ पट जास्त पवन ऊर्जा क्षेत्रात फारच कमी म्हणजे ६०० नवीन कामगार भरती झाले. २०२२ मध्ये सौर आणि पवन ऊर्जा क्षेत्रात एकूण १.६४ लाख कामगार होते. २०२१ च्या तुलनेत ते ४७ टक्के अधिक आहे. ‘लिंक्ड इन’च्या ‘ग्लोबल स्किल्स रिपोर्ट’ २०२३ नुसार, २०२२ ते २०२३ दरम्यान हरित जॉब करणार्‍या लोकांच्या संख्येत सरासरी १२.३ वाढ झाली आहे. त्याच वेळी हरित कौशल्ये आवश्यक असलेल्या नोकर्‍यांची संख्या दुप्पट झाली आहे. ‘ग्रीन इंडस्ट्री आऊटलूक’च्या अहवालानुसार सध्या भारतात सुमारे १.८५ कोटी लोक हरित नोकर्‍या करीत आहेत. या क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍यांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
 
 
जगातील सर्व देश पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न असून प्रदूषण कमी करण्यावर भर देत आहेत. भारतही या बाबतीत मागे नाही. त्यामुळे पर्यावरण वाचवण्यास मदत करणार्‍या अशा कामांना मोठी मागणी आहे.'Green Jobs'  ‘स्किल कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स’च्या अहवालानुसार २०४७ पर्यंत भारतात सुमारे ३.५ कोटी हरित नोकर्‍या निर्माण होऊ शकतात. या नोकर्‍या वेगवेगळ्या क्षेत्रात असतील. इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातही बरेच नवीन निर्माण होणार आहे. पुढील १० वर्षांमध्ये या क्षेत्रामध्ये दरवर्षी ९० टक्के वाढ होऊ शकते. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमुळे सुमारे एक कोटी प्रत्यक्ष आणि पाच कोटी अप्रत्यक्ष नोकर्‍या निर्माण होऊ शकतात. कारण वाहनांच्या निर्मितीबरोबरच त्यांची दुरुस्ती, चार्जिंग स्टेशन उभारण्यासारखे कामही खूप महत्त्वाचे आहे. याशिवाय जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची योग्य विल्हेवाट लावणे, पाण्याचा वापर, वस्त्रोद्योग पर्यावरणपूरक बनवणे, पर्यावरणाला हानी न पोहोचणारी घरे बांधणे, ही अशी क्षेत्रे आहेत, जिथे नोकर्‍यांची शक्यता सर्वाधिक आहे.
 
 
'Green Jobs' : सध्या शेती आणि खाद्यपदार्थांच्या उत्पादनांच्या नवीन पद्धतींकडेही लक्ष दिले जात आहे. हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी भारत सरकारने अनेक पावले उचलली आहेत. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य), ग्रीन एनर्जी (जीईसी), हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहने, इंटरनॅशनल सोलर अलायन्स (आयएसए) ही त्याची काही उदाहरणे आहेत. प्रत्येक घरात वीज पोहोचविणे हे ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजने’चे उद्दिष्ट आहे. लोकांना वीज पुरविण्यासोबतच भविष्यात सौरऊर्जेसारखे हरित पर्याय स्वीकारण्याचा मार्गही यामुळे खुला झाला आहे. ‘ग्रीन एनर्जी कॉरिडॉर’ अंतर्गत ‘पॉवर लाईन्स’चे जाळे तयार केले आहे. त्यातून वारा आणि सूर्यापासून निर्माण होणारी वीज देशाच्या विविध भागात पोहोचविवली जाऊ शकते. यामुळे हरित ऊर्जेचे उत्पादन आणि वापर वाढण्यास मदत होईल. इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अवलंब आणि उत्पादन योजनेचा उद्देश इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि देशात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढेल. ‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’ एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जिचा उद्देश सौर ऊर्जेचा वापर वाढविणे हा आहे. भारत या संघटनेचे नेतृत्व करत आहे. स्वच्छ इंधन म्हणून हायड्रोजनचा पर्याय विकसित करणे हे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचे उद्दिष्ट आहे.
 
 
त्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि ऊर्जा सुरक्षा वाढेल. पर्यावरणाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम न करता पृथ्वी आणि तिच्या रक्षण करणे, मानवी विकासाचे रक्षण करणे हे 'Green Jobs' ‘ग्रीन जॉब्स’च्या श्रेणीमध्ये मोडणारे व्यवसाय आहेत. श्रमिक बाजारपेठेत या नोकर्‍या वेगाने वाढत आहेत. कारण हवामान बदलाच्या घटनांची सतत वाढत जाणारी वारंवारता आणि त्यामुळे सजीव परिसंस्थांना होणारे नुकसान पाहता पृथ्वीच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा कल वाढत आहे. २०२२ च्या एका अहवालानुसार २०२६ पर्यंत ऊर्जा आणि पर्यावरणीय स्थिरतेसाठी २.४ ते २.६ दशलक्ष नवीन रोजगारांची आवश्यकता असेल. ग्रीन किंवा ‘इकोलॉजिकल इकॉनॉमी’ची कल्पना प्रत्यक्षात २००६ मध्ये ब्रिटिश सरकारने सुरू केलेल्या हवामान बदल आणि पर्यावरणीय जोखमींच्या अभ्यासातून पुढे आली. हरित अर्थव्यवस्था ही सामाजिक आणि पर्यावरणीय टिकाऊपणाला प्रोत्साहन देणारी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी गुंतवणुकीला पाठिंबा शाश्वत विकास वाढविणारी आहे. पर्यावरणाचे रक्षण करणार्‍या आणि शाश्वत विकासाला चालना देणार्‍या हरित करीअरमध्ये श्रम बाजार वाढत आहे. ‘इंटरनॅशनल रिन्यूएबल एनर्जी’च्या सर्वात अलिकडील अंदाजानुसार, २०३० पर्यंत जागतिक स्तरावर एकट्या अक्षय ऊर्जा क्षेत्रात किमान ३८ दशलक्ष अधिक नोकर्‍या असतील. या अहवालानुसार ऊर्जा क्षेत्रातील नोकर्‍यांची संख्या १३९ दशलक्षपर्यंत वाढू शकते. त्यात कार्यक्षमता, इलेक्ट्रिक वाहने, पॉवर/लवचीकता प्रणाली आणि हायड्रोजन क्षेत्रातील ७४ दशलक्ष नोकर्‍यांचा समावेश आहे.
(लेखक वन्यजीव आणि पर्यटनविषयक अभ्यासक आहेत.)