13 वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर, शाळेतील शिपायावर बलात्काराचा आरोप

01 Sep 2024 09:41:27
फर्रुखाबाद, 
Farrukhabad rape case उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कारासारखा जघन्य गुन्हा उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिपायाने 13 वर्षीय मुलीसोबत हे गुन्हेगारी कृत्य केले, त्यानंतर ती गर्भवती राहिली. शाळेतील शिपाई आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
 
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की  १३ वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलगी रात्री शौचास गेली होती तेव्हा गावातील पंकज आणि अमितने तिला पकडून एका रिकाम्या घरात नेले, तिथे अमितने तिच्यावर बलात्कार केला, तर पंकज बाहेर उभा होता. Farrukhabad rape case अधिकाऱ्याने सांगितले की, "आरोपींनी पीडितेच्या तोंडात कापड भरले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्यांनी मुलीला धमकी दिली की, जर तिने याबद्दल कोणाला काही सांगितले तर ते तिला ठार मारतील, मात्र ती पाच महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर तिच्या आईला ही बाब समजली. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला."
पोलिसांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पोक्सो) कायद्याच्या तरतुदीनुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज कौन्सिलच्या शाळेत शिपाई असून त्याला अनुकंपा तत्त्वावर ही नोकरी मिळाली आहे. कायमगंज कोतवालीचे प्रभारी निरीक्षक राम अवतार यांनी सांगितले की, मुलीची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी लवकरच अटक करण्यात येईल. हेही वाचा : एका मुलामुळे थांबले इस्रायल-गाझा युद्ध
Powered By Sangraha 9.0