बंगालच्या उपसागरात तीव्र भूकंप

01 Sep 2024 10:25:04
नवी दिल्ली, 
earthquake in Bay of Bengal बंगालच्या उपसागरात रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 51 एवढी मोजण्यात आली आहे. रविवारी सकाळी 9.12 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. साधारणपणे भूकंपामुळे समुद्रात उंच लाटा उसळू लागतात. अनेक प्रसंगी त्सुनामीचा धोकाही निर्माण होतो. मात्र, अद्याप असा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. हेही वाचा : अमेरिकेत घरांवर पडले विमान, अनेकांचा मृत्यू VIDEO
 
earthquake in Bay of Bengal
 हेही वाचा :परिवर्तनासाठी यावे गणेशा !
अमेरिकेच्या 'युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे' (यूएसजीएस) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अंदमान आणि निकोबार बेटांच्या केंद्रशासित प्रदेशातील पारका गावाच्या खाली 135 किमी खोलीवर होता. भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रसपाटीपासून 10 किलोमीटर खाली होता. earthquake in Bay of Bengal यूएसजीएसने अद्याप 'आफ्टर शॉक' अर्थात भूकंपानंतर पुन्हा धक्क्यांबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. केंद्र अंदमानपासून जवळ असल्यामुळे तेथेही भूकंपाचे धक्के जाणवण्याची शक्यता आहे.
मात्र बंगालच्या उपसागरात भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी एप्रिल महिन्यातही येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. 11 एप्रिल रोजी बंगालच्या उपसागरात 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्याची खोली देखील 10 किमी होती. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. साधारणपणे दर महिन्याला येथे भूकंपाची नोंद होते. तथापि, जेव्हा तीव्रता जास्त असते तेव्हा पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवतात.
Powered By Sangraha 9.0