साप्ताहिक राशिभविष्य

01 Sep 2024 06:00:00
साप्ताहिक राशिभविष्य  
 
 
rashi
 
मेष (Aries Zodiac) : कार्यक्षेत्रात नाव व्हावे
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील सुख स्थानातून सुरू होत आहे सध्या आपला राशिस्वामी मंगळ पराक्रम स्थानात आहे. ही ग्रहस्थिती आपल्यासाठी अतिशय उत्तम ठरणारी आहे. विशेषतः युवावर्गाला हा सप्ताह उत्तम जावा. युवांना नोकरी-व्यवसायाच्या संदर्भात हा सप्ताह काही महत्त्वाचे योग देणारा, भाग्योदयकारक ठरावा. कार्यक्षेत्रात आपले नाव उंचावण्यास मदत व्हावी, असे योग संभवतात. या आठवड्यासह पुढचा काही काळ तरुण मंडळींना विवाहयोग जुळून उपयोगी ठरावा. कुटुंबात आनंद, उत्साह व समाधानाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक - २, ३, ४, ५.
 
 
 
वृषभ (Taurus Zodiac) : चांगल्या घडामोडी घडतील
या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीच्या पराक्रम स्थानातून सुरू होत आहे. दुसरीकडे राशिस्वामी शुक्र पंचम स्थानात असून तो आपला आध्यात्मिक व आत्मिक त्रिकोण बळकट करीत आहे. त्यामुळे आपल्या काही चांगल्या घडामोडी घडतील. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन व्हावे किंवा त्यात सहभाग वाढेल. व्यवसायातील आर्थिक उलाढाली वाढतील. विस्ताराच्या योजना राबविता येतील. सामाजिक कार्यातून लाभ मिळू शकणार असल्याने समाजकार्य, राजकारण या क्षेत्रातील मंडळींना सुसंधी लाभू शकतात. शिक्षण, नोकरी वा अन्य काही कारणाने विदेशात जाण्याच्या योजना असतील तर त्यांना गती मिळू शकेल.
दिनांक - २, ३, ५, ६.
 
मिथुन (Gemini Zodiac) : कौटुंबिक सुख-स्वास्थ्य लाभावे
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील धन स्थानातून सुरू होत आहे तर आपला राशिस्वामी बुधदेखील चंद्रासोबत धनस्थानात विराजमान आहे. अशातच आपल्या राशीत मंगळ आहे. काही धाडसी निर्णय घेऊन वेगाने पुढे जाण्यासाठी उपयुक्त हा सप्ताह ठरावा. आपल्या कौटुंबिक सुख-स्वास्थ्याचे नवे पर्व सुरू होईल, असेही म्हणता येईल. कुटुंबात आपल्या नेतृत्वाखाली काही धार्मिक, आनंदी व उत्साहवर्धक कार्यक्रमांचे आयोजन होऊ शकते. युवा वर्गास नोकरी-व्यवसायासाठी तसेच प्रेमसंबंध, विवाह याबाबत उत्तम योग लाभण्याची शक्यता आहे. काही युवांना मनासारखा जोडीदार लाभू शकेल. शुभ दिनांक - ४, ५, ६, ७.
 
 हेही वाचा : उबाठाकडून निव्वळ ढोंगबाजी
कर्क (Cancer Zodiac) : कार्यक्षेत्रात समाधानाचे वातावरण
या सुरुवातीला आपला राशिस्वामी चंद्र स्वस्थानातून भ्रमण सुरू करीत आहे तर आपल्या राशीत बुध ठाण मांडून बसला आहे. हे ग्रहमान शुभसूचक आहे. साधारणतः या सप्ताहभर आपण काही विशेष घडामोडी अनुभवू शकणार आहात. काही युवांच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या संबंधातील प्रयत्नांना यश मिळेल. नवा व्यवसाय सुरू करता येईल. व्यवसायात असलेल्यांना त्यांच्या व्यवसायाची वाढवता येईल. व्यवसाय वाढल्यानंतर आर्थिक आवक वाढेलच. नोकरीतही समाधानकारक वातावरण निर्माण होऊ शकते. काही शुभ वार्ता आनंदात भर घालतील.
शुभ दिनांक - २, ३, ६, ७.
 
 
सिंह (Leo Zodiac) : कायदेशीर बाजू सांभाळा
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील व्यय स्थानातून सुरू होत आहे. त्याचवेळी आपला राशिस्वामी रवी स्वराशीतच आहे. या ग्रहमानामुळे आठवडा आपणास काहीसा संमिश्र स्वरूपाचा ठरावा. रवीच्या प्रभावाने मुलांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, युवांच्या विवाहासंबंधी काही कार्ये घडू शकतात. सप्ताहाचा उत्तरार्ध काही मंडळींना काहीसा कटकटीचा जाण्याची शक्यता आहे. कोणत्याही कायदेशीर बाबतीत अडकू नका. काळजी घ्या. वाहने सांभाळून चालवा. पडझड, किरकोळ अपघात यांची शक्यता नाकारता येत नाही.
शुभ दिनांक - २, ५, ७.
 
 हेही वाचा : शरद पवारांची शपथ नेमकी कशासाठी?
कन्या (Virgo Zodiac) : आर्थिक स्थिती मजबूत व्हावी
या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील लाभ स्थानातून सुरू होत आहे तर आपला राशिस्वामी बुध लाभात चंद्रासोबतच आहे. आपल्या राशीत शुक्र व केतूची उपस्थिती आहे. ही ग्रहस्थिती पाहता या सप्ताहात आपल्या वाट्याला उत्तम योग यावेत. आपली आर्थिक स्थिती अधिक सुदृढ करणार्‍या लाभतील. दरम्यान, या आठवड्यात आपल्याला स्वतःच्या स्वभावात संयमाचा गुण बाणावा लागणार आहे. शुक्र-केतू योग काहीसा वाचाळपणा, चिडखोरपणा, संतापी वृत्ती निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वभावातील या बदलांचा परिणाम आपल्या निर्णय क्षमतेवर होऊ शकतो.
शुभ दिनांक - २, ३, ५, ६.
 
 
तूळ (Libra Zodiac) : सकारात्मक ऊर्जेचा लाभ
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे आपल्या कुंडलीतील दशम या कर्मस्थानातून सुरू होत आहे तर आपला राशिस्वामी शुक्र हा केतूसोबत आपल्या कुंडलीत व्यय स्थानी विराजमान आहे. शुक्र आपणास सुरुवातीला काही खर्चिक योग देणार असला, तरी सप्ताहाच्या उत्तरार्धात तो सकारात्मक ऊर्जा प्रदान करेल. त्यामुळे आपणास अपेक्षित लाभ आठवड्याच्या उत्तरार्धात अधिक मिळू शकेल. आपल्या महत्त्वाच्या कामांना या गती द्यायला हवी. ओळखीतून तसेच वरिष्ठांच्या सहवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहेच्छू युवा वर्गाला चांगले योग यावेत. नवविवाहितांना संततीबाबत शुभ वार्ता मिळाव्या.
शुभ दिनांक - ४, ५, ६, ७.
 
 
वृश्चिक (Scorpio Zodiac) : खर्चिक घटनाक्रम, उधळपट्टी
या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील नवम या भाग्य स्थानातून सुरू होत आहे तर सध्या राशिस्वामी मंगळ अष्टम स्थानात काहीसा विपरीत अवस्थेत आहे. या ग्रहस्थितीच्या प्रभावामुळे आपणास संमिश्र योग लाभावेत. सप्ताहाची सुरुवात खर्चिक घटनाक्रमाने होऊ शकते. विशेषतः छंद, हौस यावर आपणास जरा अधिक व प्रसंगी अनावश्यक म्हणता येईल, असा खर्च करावयास लावणार आहेत. खानपानात अनियमितता व पैशाची उधळपट्टी संभव आहे. अशातच आरोग्याकडे दुर्लक्ष करू आपली कामे व आरोग्याची काळजी यासंबंधात दिनक्रम ठरवणे फायद्याचे राहील. वाहने सांभाळून चालवावीत.
शुभ दिनांक - १, २, ३, ७.
 
 
धनु (Sagittarius Zodiac) : आरोग्याची काळजी घ्या
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील अष्टम या पीडादायक स्थानातून सुरू होत आहे तर आपला राशिस्वामी गुरू सहाव्या या अनारोग्याच्या स्थानात असल्याने आरोग्यविषयक काही विपरीत निर्माण करण्याची शक्यता आहे. कामाची दगदग, कार्यक्षेत्राचा वाढलेला व्याप आपण सध्या अनुभवीत असाल. कामांना न मिळणार्‍या वेगामुळे ही दगदग करावी लागत आहे. मात्र यातून लवकरच मार्ग निघेल. काही वयस्क मंडळींना या सप्ताहात आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. साथीचे आजार, हवामानातील बदल त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे खानपान, औषधोपचार सांभाळा.
शुभ - २, ४, ५, ६.
 
 
मकर (Capricorn Zodiac) : जोडीदाराला उत्तम संधी
या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील सप्तम या जोडीदाराच्या स्थानातून सुरू होत आहे. आपला राशी स्वामी शनी धन स्थानात आहे. योगकारक शुक्राशी होणारा त्याचा भाग्ययोग आपणास उत्तम आहे. या ग्रहस्थितीमुळे अतिशय शुभ प्रभाव आपणास लाभणार आहेत. विशेषतः आपल्या जोडीदाराच्या काही शुभ वार्ता कानी पडतील. काही महत्त्वाचे योग घडू शकतील. आर्थिक आघाडीवर समाधान राहणार असतानाच एखाद्या अचानक मोठ्या खर्चाचेही संकेत मिळत आहेत. तरुण वर्गाला नोकरी- व्यवसायात उत्तम संधी, पगारवाढ, पदोन्नतीचे- थोडक्यात भाग्योदयाचे योग लाभू शकतात.
शुभ दिनांक - २, ३, ५, ७.
 
 
कुंभ (Aquarius Zodiac) : कामे रेंगाळण्याची शक्यता
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी भ्रमण आपल्या कुंडलीतील सहाव्या या अनारोग्याच्या स्थानातून सुरू होत आहे. मात्र, सध्या राशिस्वामी शनी स्वस्थानी बलवान आहे. योगकारक शुक्र मात्र पीडादायक अष्टम स्थानात असल्याने काहीसे संमिश्र योग या सप्ताहात आपल्या वाट्याला यावेत. या काळात आपली कामे काहीशी लांबणीवर पडू शकतात. हाती येत असलेली एखादी संधी उगीचच प्रलंबित राहिलेली जाणवू स्थावर मालमत्तेसंबंधीचे व्यवहार रेंगाळू शकतात. सप्ताहाच्या अखेरीस वाहनादी मोठ्या खरेदीच्या योजनांना मूर्त रूप मिळू शकेल. काही व्यावसायिकांना विस्ताराच्या योजना राबविता येतील. शुभ दिनांक - ४, ५, ६, ७.
 
 
मीन (Pisces Zodiac) : प्रगतिपथावर दमदार वाटचाल
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील पंचम या शुभ स्थानातून सुरू होत आहे. अशातच सध्या आपला गुरू पराक्रम स्थानात विराजमान आहे. ही ग्रहस्थिती आपणास उत्तम आर्थिक स्थितीसह आरोग्य व अन्यही संदर्भात उत्तम योग व आवश्यक सबलता देणारी आहे. मात्र दुसरीकडे मनाचा त्रागा वाढेल. अकारण भांडणे, वाद, आर्थिक देवाण-घेवाणीत कलुषितपणा, नोकरी-व्यवसायात स्पर्धा असल्या घटनाही अनुभवास येण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात जरा स्थिती आणखी सुधारून दिलासा मिळेल. अनुभवी तसेच थोरा-मोठ्यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.
शुभ दिनांक - १, २, ४, ६.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, ८६००१०५७४६
Powered By Sangraha 9.0