‘वर्षा’वर शेतकरी, पोलिस, स्वच्छता कर्मचार्‍यांनी केली गणरायाची आरती

    दिनांक :10-Sep-2024
Total Views |
मुंबई, 
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती शेतकरी, पोलिस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषाने वातावरण भारावून गेले होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.
 
 
aarti
 
CM Eknath Shinde : हिंगोली जिल्ह्यातील लोहारा येथील काही शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. हस्ते गणपतीची दुपारची आरती करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांची घरे, शेती पूर्णपणे वाहून गेली. त्यासंदर्भात बालाजी आढळकर, सखाराम बोडके, उमेश चव्हाण हे शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. त्यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या शेतकर्‍यांची भेट घेऊन विचारपूस करीत त्यांना दिलासा दिला. यावेळी वर्षा कर्तव्यावर असलेले पोलिस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्तेदेखील यावेळी आरती करण्यात आली.