मुंबई,
BJP Andolan : काँग्रेस नेते राहुल यांनी अमेरिका दौर्यावर असताना आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात महाराष्ट्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन केले.आरक्षणाविरोधात राहुल गांधींची मानसिकता लोकांना कळण्यासाठी आंदोलन करणे आवश्यक आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तर भाजपा खोट्या बातम्या पसरवीत आहे आणि भाजपा नौटंकी करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात केला.
भारत हे एक न्याय्य ठिकाण आहे, तेव्हा आरक्षण रद्द करण्याचा विचार करेल, पण सध्या तशी परिस्थिती नाही असे विधान राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौर्यात जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले होते. गत १० वर्षांपासून भारतात लोकशाही खंडित झाली होती, परंतु आता ती परत लढत आहे, असा आरोप गांधी यांनी वॉशिंग्टनमधील नॅशनल प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
BJP Andolan : राहुल गांधी यांच्या या आरक्षण विरोधी वक्तव्यावर भाजपाने राज्यव्यापी निषेध जाहीर केला. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांसोबत फलक घेऊन निदर्शने केली व गांधींविरोधात घोषणाबाजी केली. काँग्रेसचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून राहुल गांधींपर्यंत आरक्षणाला करत आहे, असा दावा भाजपाच्या दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी यांनी मुंबईतील आंदोलनादरम्यान केला. गांधींची आरक्षण विरोधी भूमिका उघड झाली आहे, असे त्या म्हणाल्या.
BJP Andolan : भाजपाच्या या आंदोलनावर काँग्रेसचे थोरात यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपा खोट्या बातम्या पसरवत असून हे आंदोलन म्हणजे ही भाजपाची नौटंकी आहे, असा आरोप थोरात यांनी राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यात आरक्षण नाहीसे केले जाईल असे कधीही म्हटले नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.