हिंदू संस्कृतीचा विश्वसंचार

13 Sep 2024 18:17:12
संस्कृती
- रविकुमार अय्यर
अरब विश्वात हिंदू धर्म
Hindu culture : दुबईतील शीख गुरुद्वारा, गुरू नानक दरबार १०,००० हून अधिक उपासकांना सेवा देतात. २० मिलियन डॉलर खर्चून बांधलेला हा गुरुद्वारा ५ ऑक्टोबर २०२२ मध्ये भाविकांसाठी सुरू करण्यात आला. येथे दर शनिवारी शनिवारी मुलांसाठी तीन तासांचे विशेष सत्र केले जाते. मुलांना पंजाबी भाषा, कीर्तन आणि इतर धार्मिक शिक्षणही दिले जाते. अनेक स्थानिक अरब स्त्री आणि पुरुष हिंदू भजने गाताना दिसतात. संपूर्ण अरब विश्व, इराण आणि तुर्कस्तानमध्ये योग खूप लोकप्रिय आहे.
हिंदूंचे अंतिम संस्कार करण्यासाठी एक अबुधाबीमध्ये आणि दुसरी दुबईत अशा दोन स्मशानभूमी आहेत. पाकिस्तानात योगी हैदर (जन्म हैदर) हे एक प्रसिद्ध योग शिक्षक आहेत, जे १९९४ पासून कार्यरत आहेत. आज त्यांच्या संस्थेच्या इस्लामाबाद, कराची, रावळपिंडी आणि लाहोरमध्ये शाखा असून तेथे १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले जाते.
 
 
mandir
 
पाश्चात्त्य विश्वात हिंदू आणि हिंदू धर्म
Hindu culture : २०२२ मध्ये इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान ऋषी सुनक यांनी लंडनमध्ये पत्नी अक्षता मूर्तीसह केली होती. भारतीय वंशाचे लिओ वराडकर हे २०२२ मध्ये आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. डॉ आनंद सत्यानंद यांनी २००६ ते २०११ पर्यंत न्यूझीलंडचे गव्हर्नर जनरल पद भूषवले. त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान बासदेव पांडे यांनी १४ जानेवारी २००० रोजी हनुमान चालिसाचा जप करण्यासाठी ५०,००० जणांच्या विशाल हिंदू मेळाव्याचे नेतृत्व करीत स्वागत केले. २०१६ मध्ये कमला परसॉड बिसेसर यांनी श्रीमद् भगवद्गीतेवर हात ठेवून त्रिनिदादचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. २०२० मध्ये चंद्रिका प्रसाद संतोकी यांनी संस्कृत श्लोक आणि मंत्रांचा जप करीत सुरीनामचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. एक प्रसिद्ध घटना आहे जी अमेरिकेतील अनिवासी भारतीय नेहमी सांगतात. एकदा एका गॅस स्टेशनवर एक इंधनाचे पेमेंट करण्यासाठी कॅशियरकडे गेला. कॅशियर एक गोरा अमेरिकन होता. त्याने पेमेंट घेताना ‘आपण भारतीय आहात’ अशी टिप्पणी केली. त्यावर त्या भारतीयाने विचारले की मी पाकिस्तानी नसून भारतीय आहे हे एवढ्या खात्रीलायक आपण कसे म्हणू शकता? त्या गोर्‍या अमेरिकन रोखपालाने उत्तर दिले, ‘तुम्ही महागडी बीएमडब्ल्यू कार चालवत आहात. पाकिस्तानी अशा महागड्या वस्तू खरेदी करणे आवाक्याबाहेरचे आहे. आपण ‘ए.बी.सी.डी.’ असू शकता- अर्थात अ‍ॅटर्नी जनरल, बॅरिस्टर, कन्सल्टंट आणि डायरेक्टर. त्यानंतर त्या भारतीयाने अमेरिकन माणसाला गैर-भारतीयांबद्दल विचारले. यावर तो अमेरिकन कॅशियर उत्तरला, ते (अभारतीय) ‘एबीसीडी’ आहेत अर्थात ‘आतंकवादी’, ‘बॉम्ब ब्लास्टर’, ‘कुली’ आणि ‘ड्रायव्हर’. नंतर ती अमेरिकन व्यक्ती खेदपूर्वक म्हणाली, ‘तुम्ही भारतीय गोर्‍या मुलांची हत्या करीत आहात! अर्थात शारीरिकदृष्ट्या नाही तर स्पर्धांच्या माध्यमातून. आमची सर्व महाविद्यालये भारतीय विद्यार्थ्यांनी ओसंडून वहात आहेत. गूगल, आयबीएम आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या अनेक आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत.’
 
 
पटेल ही गुजरातींच्या अनेक जातींपैकी एक आहे. अमेरिकेमध्ये भारतीयांची एकूण संख्या तिथल्या लोकसंख्येच्या एक टक्क्याहून देखील कमी आहे पटेल तर त्याहून कमी संख्येत आहेत. ते अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या ०.१ टक्केही नाहीत. मात्र, असे असूनही ते ७० टक्के मोटेलचे मालक आहेत. असे कसे? तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटत असेल. वस्तुस्थिती ही आहे की मोटेल चालवणे हा श्रम-प्रधान व्यवसाय आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍यांची भरती करण्याऐवजी पटेल कुटुंबातील सर्व सदस्यांना मोटेलमध्ये सामावून घेण्यात येते. म्हणजेच पटेल मंडळींनाच काम दिले जाते. त्यामुळे ते ग्राहकांना इतर मोटेलपेक्षा कमी दरात सेवा देऊ शकतात. विविध कारणांनी मोटेल चालवणे अशक्य होऊन बसल्याने गेल्या पाच दशकांत बहुतेक अमेरिकन लोकांनी त्यांची मोटेल विकली आणि त्यामुळे आज ७० टक्के मोटेलचे मालक पटेल आहेत.
एक अमेरिकन टिप्पणी : एखादे मूल अमेरिकेत हिंदू कुटुंबात लहानाचे मोठे झाले तर त्याचा विवाह मोडण्याची शक्यता फारच कमी आहे; त्याला शैक्षणिक प्रोत्साहन मिळण्याची शक्यता १०० टक्के आहे. कठोर परिश्रम, कर्तृत्व आणि जीवनात तुम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टी मिळविण्याची क्षमा ही इतरांपेक्षा भारतीयांमध्ये खूपच उच्च पातळीवर आहे’’ भारताची प्राचीन कौटुंबिक परंपरा आजही संपूर्ण किती प्रासंगिक आहे, हे या टिप्पणीवरून स्पष्ट होते.
 
 
आजचा भारत
भारतीय संस्कृती आम्हाला विक्रीपेक्षा सेवा, त्रासापेक्षा सन्मान आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नफ्यापेक्षा लोकांना जास्त महत्त्व देण्यास शिकवते आणि या मूल्यप्रणालीने त्यांच्या प्रगतीमध्ये कोणत्याही प्रकारे अडथळा आणला नाही. ७.२ टक्के विकास दरासह भारत ही आज सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारतातील मध्यमवर्गाची लोकसंख्या संपूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे.
 
 
Hindu culture : भारताचे सरासरी वय २८ आहे तर चीन आणि एमरिकेसाठी ते ३८.५ वर्षे, जर्मनी युरोपियन युनियनच्या देशांचे सरासरी वय ४५ वर्षे आणि जपानचे ४८.६ वर्षे आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की भारत हा २०५२ तरुणांचा देश राहणार आहे. दुसरीकडे चीन, जपान आणि युरोपीय देश वेगाने वृद्ध होत आहेत. ‘चीन एक तुरुंग आहे, जपान एक रुग्णालय आहे आणि युरोप एक संग्रहालय आहे’, असे अमेरिकेचे माजी अर्थमंत्री लॅरी समर्स यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. (अमेरिकेने भारतासोबतचे आपले संबंध आणि व्यापार-व्यवसाय अधिक मजबूत करायला हवा असे त्यांना म्हणायचे होते.) वस्तुस्थिती ही आहे की आर्थिकदृष्ट्या विकसित जी-७ देश भारतासोबतचा आपला व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी, विकसित देशांमधील अनेक प्रमुख विद्यापीठांमध्ये हिंदी भाषा शिकवली जाते. ‘हे भारताचे शतक आहे’ असे फेब्रुवारी २०२४ मध्ये अमेरिकन बहुराष्ट्रीय रणनीती आणि व्यवस्थापन सल्लागार फर्म मॅकिन्से अँड कंपनीने म्हटले होते. एप्रिल मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) कार्यकारी संचालकांनी, जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी येत्या काही वर्षांतील भारताच्या भूमिकेवर जोर दिला. तसेच कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांमध्येही भारताच्या सात टक्क्यांहून अधिक असणार्‍या विकास दरावर त्यांनी ठळकपणे प्रकाश टाकला.
 
 
अमेरिकेत या वर्षी नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांमध्ये लढत आहे. जर डेमोक्रॅटिक विजय झाला तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या २४८ वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष असतील. पण जर रिपब्लिकन पक्षाचा विजय झाल्यास उषा चिलीकुरी व्हन्स या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या भारतीय वंशाच्या ‘सेकंड लेडी’ ठरतील. कोणत्याही परिस्थितीत हा भारताचा आणि भारतीयांचा विजय आहे. आपण सर्वांनी याचा उच्चार जोमाने करूया. 
 
(ऑर्गनायझरवरून साभार)
Powered By Sangraha 9.0