राज्यात बॉक्साईट, कायनाईट-सिलिमनाईट, तांबे खनिजांचा शोध

13 Sep 2024 20:11:41
- गोंदिया-छत्तीसगड क्षेत्रात युरेनियमचे पूर्वेक्षण

नागपूर, 
भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाद्वारे Mineral Survey खनिज सर्वेक्षण व समन्वेषणाच्या १२ योजनांमुळे नागपूर जिल्ह्यात कायनाईट-सिलिमनाईट या खनिजांचे साठे शोधण्यात आले असून, नागपूर शहर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात चूनखडक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॉक्साईडचे विपुल प्रमाणात साठे उपलब्ध असल्याचा शोध लागला. परमाणू खनिज संचालनालयातर्फे गोंदिया व छत्तीसगड सीमाक्षेत्रात बिजली रायोलाईट या भूस्तरात युरेनियम खनिजांची पूर्वेक्षण योजना प्रस्तावित आहे.
 
 
Mineral Survey
 
Mineral Survey : राज्य भूवैज्ञानीय कार्यक्रम मंडळाची वी बैठक अतिरिक्त मुख्य सचिव (खनिकर्म) इकबालसिंह चहल यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत २०२३-२४ मध्ये संचालनालयातर्फे राबविण्यात आलेल्या योजना तसेच २०२४-२५ मध्ये प्रस्तावित असलेल्या खनिज सर्वेक्षणाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयातर्फे राज्यात १२ भूवैज्ञानीय योजनाद्वारे खनिज सर्वेक्षण व समन्वेषण करण्यात आले असून, यात कायनाईट-सिलिमनाईट, बॅाक्साईट शोध घेण्यात आला. २०२४-२५ या वर्षात खनिज सर्वेक्षण-पूर्वेक्षणाच्या १५ योजना राबविण्यात येणार आहे. या योजना चंद्रपूर, कोल्हापूर, नागपूर व भंडारा या जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यात इतर खनिजासोबत तांबे पूर्वेक्षणाचाही समावेश करण्यात आला.
 
 
Mineral Survey : भारतीय भूवैज्ञानीय सर्वेक्षणतर्फे तांबे, बॉक्साईट रेअर अर्थ एलिमेंट या खनिजांच्या सर्वेक्षणाला प्राधान्य देण्यात आला. भंडारा व नागपूर जिल्ह्यातील चिखली, डोंगरी बाजार, कांद्री व बेलडोंगरी, सतक येथे पूर्वेक्षणाचे काम सुरू आहे. महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपयोजना केंद्रातर्फे वेकोलिच्या खाणींचे सॅटेलाईट सर्वेक्षण करून नकाशावर आरेखन तसेच खरीप व रबी पिकांच्या नुकसान भरपाई संदर्भात सॅटेलाईट नकाशांचा अभ्यास करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0