‘हे वीर विवेकानंद हिंदू यशमूर्ती’

13 Sep 2024 17:40:37
चौफेर
- सुनीता मिश्रा
 
Swami Vivekananda : स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे झालेल्या विश्व धर्म संसदेत हिंदू संन्यासीच्या रूपात भारताचे प्रतिनिधित्व करणारे ऐतिहासिक भाषण दिले. त्यावेळी स्वामीजींचे वय अवघे ३० वर्षे होते. इतक्या लहान वयातही लोक त्यांच्या इतके प्रभावित झाले होते की त्यांना पुढील पंधरवड्यात पाच वेळा संमेलनात बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या भाषणानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी प्रकाशित ‘न्यूयॉर्क हेराल्ड’ने लिहिले - ‘विवेकानंद हे नि:संशयपणे धर्म संसदेतील सर्वात महान व्यक्ती आहेत.’
 
 
Swamiji-2
 
स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात "sisters and brothers of America' या शब्दांनी केली आणि त्यांनी हिंदूंच्या वतीने आभार व्यक्त केले. आपल्या भाषणाच्या प्रारंभीच ते म्हणाले - ‘आपल्या या स्नेहपूर्ण आणि हृदयपूर्वक केलेल्या जोरदार स्वागताने माझे हृदय अपार आनंदाने भरून गेले आहे आणि मी जगातील सर्वांत प्राचीन संत परंपरेच्या वतीने तुमचे आभार मानतो. मी आपले सर्व धर्मांच्या जननीच्या वतीने आभार मानतो, सर्व जाती, संप्रदायांच्या करोडो हिंदूंच्या वतीने मी आपले आभार मानतो.
 
 
Swami Vivekananda : स्वामीजींचे हे भाषण केवळ ४६८ शब्दांचे होते. एवढ्या कमी कालावधीतील आपल्या भाषणातही त्यांनी जागतिक स्तरावर आपली मुद्रा उमटविली. - ज्या धर्माने जगाला सहिष्णुता आणि सार्वत्रिक स्वीकृती दोन्ही शिकवले आहे, अशा धर्माचा मला अभिमान आहे. सहिष्णुता आणि सार्वत्रिक स्वीकृती या दोन्ही गोष्टींना त्यांनी धर्माचा गाभा मानले आणि ती जगात सर्वांत मौल्यवान तत्त्वे आहेत, असे प्रतिपादन केले. ते म्हणाले की आमचा केवळ सार्वत्रिक सहिष्णुतेवरच विश्वास आहे असे नसून आम्ही सर्व धर्म सत्य आहेत, असे मानतो. मला त्या देशाचा अभिमान आहे, ज्याने सर्व धर्मांना आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांकडून छळ झालेल्यांना व शरणार्थींना आश्रय दिला बंधूंनो, मी तुम्हाला एका स्तोत्रातील काही ओळी ऐकवत आहे, ज्या मी लहानपणापासून वाचत आलो आहे आणि ज्याचा पाठ दररोज लाखो लोक करतात :
 
 
रुचिनां वैचित्र्यादृजुकुटिलनानापथजुषाम्|
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव ॥
 ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्या भिन्न, भिन्न स्रोतांतून उगम पावून महासागरात विलीन होतात, त्याचप्रमाणे हे परमेश्वरा! भिन्न भिन्न रुचीनुसार वेगवेगळ्या वाकड्या सरळ मार्गावर चालणारे लोक शेवटी तुझ्याशीच एकरूप होतात.
स्वामीजींनी धर्मसंसदेत जे काही भाषण केले ते त्यांचा अनुभव आणि त्यांच्या अंत:करणातून निघालेली वाणी होती. त्यांनी आपल्या भाषणात जे काही सांगितले, त्यामुळे तेथे उपस्थित श्रोेत्यांना भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वावर चिंतन करण्याची प्रेरणा मिळाली.
 
 
स्वामीजींच्या उद्बोधनाने त्यांच्यापूर्वी भाषण करणार्‍या अनेक वक्त्यांना प्रभावित
स्वामी विवेकानंद म्हणाले की -‘सांप्रदायिकता, कट्टरता आणि त्याच्या भयंकर वंशजांच्या धार्मिक आडमुठेपणाने या सुंदर भूमीला फार पूर्वीपासून जखडून ठेवले आहे. त्यांनी ही पृथ्वी हिंसाचाराने भरली आहे आणि कितीतरी वेळा ही पृथ्वी रक्ताने लाल झाली आहे. किती संस्कृती नष्ट झाल्या आणि किती देश उद्ध्वस्त झाले कुणास ठाऊक? जर हे भयंकर अस्तित्वात नसते तर मानवी समाज आजच्यापेक्षा खूप चांगला झाला असता. मला आशा आहे की या संमेलनाचा बिगुल सर्व प्रकारची कट्टरता, दुराग्रह व दु:खाचा विनाश करणारा ठरेल. मग तो तलवारीने असो वा लेखणीने.
 
 
Swami Vivekananda : स्वामी विवेकानंदांनी आपल्या अल्पायुष्यात जे अफाट कार्य केले आणि जो भव्य, उदात्त संदेश दिला यामुळे संपूर्ण जग झाले. अशा व्यक्तीने या राष्ट्राच्या भूमीत जन्म घेतला आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण केले. निःसंशयपणे स्वामी विवेकानंद हे हिंदू होते आणि त्यांना हिंदू असल्याचा अभिमान होता. परंतु त्यांच्या तत्त्वज्ञानाने धर्माच्या ज्या स्वरूपाचा प्रसार केला त्याच्या केंद्रस्थानी माणूस होता आणि त्यांचे मूलभूत योगदान हे आहे की त्यांनी ‘हिंदुत्वा’ला मनुष्य मानवी विकासाच्या सर्वोत्तम स्वरूपाच्या अग्रस्थानी आणले. विश्व धर्म संसदेत जगभरातील प्रमुख धर्मांचे प्रतिनिधी होते ज्यात हिंदू धर्म, यहुदी धर्म, इस्लाम, बौद्ध, पारशी, कॅथलिक आणि प्रोटेस्टंट इत्यादींचा समावेश होता. पण स्वामी विवेकानंदांचे उद्बोधन सर्वांत यशस्वी व प्रभावी ठरले.
 
 
स्वामी विवेकानंदांच्या मते- मला अशा धर्माचा अनुयायी असल्याचा अभिमान वाटतो ज्याने जगाला आणि सार्वत्रिक स्वीकृती या दोन्ही गोष्टींची शिकवण दिली आहे. आम्ही केवळ सर्व धर्मांप्रती सहिष्णुतेवरच विश्वास ठेवत नाही तर समस्त धर्मांना सत्य मानून त्यांचा स्वीकार करतो. मला अशा देशाचा नागरिक असल्याचा अभिमान आहे ज्याने या पृथ्वीवरील सर्व धर्म आणि देशांतील अत्याचारित आणि शरणार्थींना आश्रय दिला आहे. सांप्रदायिकता, कट्टरतावाद आणि त्यांच्या वंशजांनी या सुंदर पृथ्वीवर दीर्घकाळ राज्य केले आहे. त्यांनी पृथ्वीवर प्रचंड हिंसाचार, रक्तपात घडवून आणला आहे, त्यांनी मानवतेचा वारंवार नाश केला आहे, जगभरातील सभ्यता, संस्कृती नष्ट केली आहे आणि त्यांनी सर्व देशांना निराशेच्या गर्तेत बुडवले आहे. जर हे भयंकर राक्षस अस्तित्वात नसते तर मानवी समाज आजच्या तुलनेत खूप उन्नत, झाला असता.
 
 
हिंदू समाजाने आपला धर्म श्रुती-वेदांपासून प्राप्त केला आहे आणि असे मानले जाते की वेद हे अनादि आणि अनंत आहेत. श्रोत्यांना हे हास्यास्पद वाटण्याची शक्यता आहे की एखादे पुस्तक अनादि आणि अनंत कसे असू शकते. पण वेदांचा अर्थ कोणताही ग्रंथ नाही. वेद म्हणजे भिन्नभिन्न कालखंडात भिन्नभिन्न लोकांनी आविष्कृत अध्यात्मिक सत्यांचा संचित कोष. वेद सांगतात की आत्मा हा दिव्यस्वरूप आहे. तो पंचतत्त्वांच्या बंधनांनी बांधलेला आहे आणि जेव्हा ती बंधने तुटतात तेव्हाच त्याला पूर्णत्वाची प्राप्ती होते आणि हे बंधन केवळ परमेश्वराच्या कृपेनेच, त्याच्या दयेनेच तोडले जाऊ शकते आणि ती कृपा पवित्र लोकांना प्राप्त होते. त्यामुळे त्या परमात्म्याची प्राप्ती करायची तर पावित्र्य व शुद्धता हाच एकमेव मार्ग आहे. शुद्ध व पवित्र अंतःकरणात परमात्मा स्वत:ला प्रकट करतो. पवित्र व निर्मळ मनुष्य याच जीवनात भगवंताची कृपा प्राप्त करून यशस्वी होतो.
 
 
शिकागो भाषण : हिंदुत्वाचा वैश्विक हुंकार
स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाने ‘हिंदुत्व’ ची भावना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केली. आपल्या या ऐतिहासिक भाषणात हिंदू धर्माच्या महान सांस्कृतिक परंपरेवर प्रकाश टाकला. त्यांनी हिंदू धर्माला एक सार्वत्रिक, सार्वजनिन धर्म म्हणून सादर केले, जो सर्व धर्म, श्रद्धा, विश्वास, पंथ, संप्रदाय, उपासना पद्धती याविषयी सहिष्णुता आणि आदराची भावना वाढवतो. हिंदू धर्म हा एक असा धर्म आहे जो विविध पंथ आणि श्रद्धांना एकाच सत्याकडे नेणारे भिन्न मार्ग असे मानतो, असे स्वामी विवेकांनदांचे प्रतिपादन होते. हिंदू धर्माची मुख्य वैशिष्ट्ये सांगताना ते म्हणाले की, यात सहिष्णुता, मानवता आणि सर्वांचा आदर करण्याची भावना आहे. हिंदू धर्म मानवतेच्या भावनेला सर्वोच्च मानतो आणि ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही भावना त्यात अंतर्भूत आहे, अशा शब्दात त्यांनी हिंदूधर्माचे वैशिष्ट्य मांडले. हिंदुत्व हे कोणत्याही विशिष्ट जाती पंथापुरतेच मर्यादित नसून सर्वांना एकता आणि बंधुत्वाच्या मार्गावर चालण्याचे आवाहन करते, असा संदेश स्वामीजींनी या माध्यमातून दिला.
 
 
Swami Vivekananda : स्वामी विवेकानंदांच्या या भाषणाने पाश्चात्त्य विश्वाला हिंदू धर्माच्या गहनतेचा आणि सार्वत्रिकतेचा नवीन दृष्टिकोन प्रदान केला. त्यांनी स्पष्ट केले की हिंदू धर्म ही केवळ सांस्कृतिक किंवा धार्मिक ओळख नाही तर तो एक व्यापक सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे जो संपूर्ण मानवतेला एकजूट करू पाहतो. स्वामी विवेकनंदांचे शिकागोतील भाषण जगभरात हिंदू धर्माची नवी प्रतिमा निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. या भाषणात त्यांनी हिंदू धर्माची उदात्त तत्त्वे आणि त्यांचे सार्वजनिक महत्त्व यावर सखोल प्रकाश टाकला -
 
 
हिंदुत्वाची व्यापकता आणि सर्वसमावेशकता
स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचा एक वैश्विक, दृष्टिकोन प्रस्तुत केला. ते म्हणाले की, हिंदू धर्म हा कोणत्याही एका जाती, संस्कृती किंवा प्रदेशापुरता मर्यादित नाही. त्याऐवजी, ही एक अशी प्रणाली आहे जी सर्व धर्म, जाती आणि संस्कृतींचा स्वीकार करते व त्यांच्यात समन्वय प्रस्थापित करते. हिंदू धर्माच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाचे वर्णन करताना ते म्हणाले की, भिन्न भिन्न धार्मिक मार्ग एकाच सत्याकडे जाणारे वेगवेगळे मार्ग मानले जातात.
 
 
धर्माची व्याख्या : स्वामी विवेकानंदांनी धर्माची अनोखी, अद्वितीय व्याख्या केली. त्यांच्या मते धर्म हा केवळ पूजा किंवा कर्मकांडापुरता मर्यादित नाही. त्यांना धर्माकडे मानवतेची सेवा आणि आत्म्याचा शोध म्हणून पाहिले. त्यांनी हिंदू धर्माला एक असा मार्ग सांगितले जो आत्म्याचे अनंतत्व आणि मानवतेचा आदर्श मदत करते.
सहिष्णुता आणि सर्वांचा आदर : हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सहिष्णुता आणि भिन्न भिन्न धार्मिक श्रद्धांचा आदर होय. हिंदू धर्म सर्व धर्मांची समानता आणि त्यांच्याविषयी आदराची भावना वृद्धिंगत करतो, असे स्वामी विवेकानंदांनी स्पष्ट केले. त्यांनी उदाहरण म्हणून भारतीय समाजाला प्रस्तुत केले. ज्यामध्ये विविध धर्म आणि श्रद्धांचे आहे.
वैश्विक मानवता आणि एकता : स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्म हा वैश्विक मानवतेच्या एकतेचा आणि बंधुत्वाचा मार्ग म्हणून मांडला. हिंदू धर्माचे तत्त्व सर्व मानवांमध्ये एकता, मानवता आणि वैश्विक प्रेमाकडे घेऊन जाते, असे मत त्यांनी मांडले. हिंदू धर्माचा सिद्धांत सर्व मनुष्यांची एकता, मानवता व वैश्विक प्रेमाकडे घेऊन जातो. हिंदू धर्म वैश्विक अवधारणेवर विश्वास ठेवतो, जेथे सर्व जीव एकमेकांशी जोडलेले आहेत.
हिंदू धर्म: एक जीवन दृष्टी : स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माला केवळ धार्मिक विश्वास म्हणून नव्हे तर जीवनाचा व्यापक दृष्टिकोन या अंगाने प्रस्तुत केले. समाजाला योग्य दिशा देणारी आणि व्यक्तीला प्रोत्साहन देणारी आदर्श आणि मूल्यांची एक प्रणाली या दृष्टीने त्यांनी धर्माकडे पाहिले.
शिकागो भाषण : विश्वबंधुत्वाचा संदेश
Swami Vivekananda : स्वामी विवेकानंदांचे शिकागो भाषण हे विश्वबंधुत्व आणि वैश्विक मानवतेच्या महत्त्वावर एक महत्त्वाचा संदेश होता. आपल्या या भाषणात स्वामी विवेकानंदांनी भारताच्या धार्मिक विविधतेचे आणि सार्वत्रिकतेचे उदाहरण दिले आणि जगाला एकता, सहिष्णुता आणि परस्पर आदराची गरज असल्याचे आवाहन केले. आपल्या भाषणात वैश्विक बंधुत्वाची भावना करताना स्वामी विवेकानंद म्हणाले की, सर्व धर्मांचे मूळ एकच असून सर्व मानवता एका कुटुंबाप्रमाणे आहे. स्वामी विवेकानंद असेही म्हणाले की विविध धर्मांमधील मतभेद नकारात्मक दृष्टिकोनातून नाही तर परस्पर सामंजस्य व आदराने सोडवले जावे. सर्व धर्म, संस्कृती आणि जातींनी एकमेकांप्रती सहिष्णुता आणि समजूतदारपणा वाढवला पाहिजे, जेणेकरून संपूर्ण विश्वात शांती आणि निर्माण होईल, असा त्यांचा संदेश होता. 
Powered By Sangraha 9.0