पाकिस्तानने अफगाणमधील विशेष प्रतिनिधीला माघारी बोलावले

14 Sep 2024 20:54:14
इस्लामाबाद, 
पाकिस्तान सरकारने अफगाणिस्तानातील आपले विशेष प्रतिनिधी Asif Durrani आसिफ दुर्राणी यांना माघारी बोलावले आहे. इस्लामाबाद आणि काबुलमधील वाढत्या तणावाच्या पृष्ठभूमीवर पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचे शनिवारी प्रसारमाध्यमांनी सांगितले. अधिकृत माहितीनुसार, अफगाणिस्तानमधील व्यवस्थापन पदावर विशेष प्रतिनिधी म्हणून तैनात असलेल्या दुर्राणी यांना १० सप्टेंबर रोजी त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले.
 
 
Asif Durrani
 
सूत्रांनी दिलेल्या दुर्राणी यांची गेल्या वर्षी मे महिन्यात या पदावर नियुक्ती करण्यात आली होती; परंतु ते पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध सुधारू शकले नाहीत. दुर्राणी यांचा तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकारशी फारसा संपर्क नसल्यामुळे काबुलने त्यांना स्वीकारले नाही, असेही सांगण्यात आले. दुर्राणी यांच्या कामगिरीवर देशाचे लष्कर नाराज असल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. धोरणात्मक दुर्लक्ष होत असल्याने Asif Durrani दुर्राणीही संतापले होते. त्यांनी एका संदेशात आपल्या प्रस्थानाची पुष्टी केली. यासोबतच पाकिस्तानची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.
Powered By Sangraha 9.0