गठ्ठा मतांसाठी थयथयाट

14 Sep 2024 06:00:00
वेध
- नीलेश जोशी
कल्याणकारी आणि For mass voters कायद्याचे राज्य असावे, अशी सामान्य सज्जनांची इच्छा असते. या निकषात काम करणारे राज्यकर्ते असले की, सामान्यजन आनंदी असतात. पण जे कायदा मानतच नाहीत, ज्यांची निष्ठा, श्रद्धा अन्यत्र असते, पण सोईच्या वेळी जे प्रचलित कायद्याचा आधार घेतात आणि बहुतांश वेळा ‘धर्मा’चा आधार घेत कायदा मोडतात. त्यांच्यामुळे अनेकदा समाजात अशांतता निर्माण करणार्‍या घटना घडत असल्याचे दिसून येते. उल्लंघन करणार्‍या या For mass voters गठ्ठा मतदारांसाठी स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणविणारे राजकारणी प्रसंगी आवाज मोठा करून आरडाओरडा करतात. ज्याने कायदा मोडला त्याची बाजू घेत मानवाधिकाराचे ठेवणीतील अस्त्र बाहेर काढतात. असे समर्थन करताना त्यांना कायद्याचे उल्लंघन झाल्याची चिंता किंवा मानवाधिकाराची काळजीही नसते. त्यांची अस्वस्थता असते केवळ आणि केवळ गठ्ठा मतांची.
 
 
votebank
 
 
आपल्याला मिळणारा For mass voters गठ्ठा मतांसाठी  त्यांचा थयथयाट असतो. हे सामान्यजनांचे, लोकशाही व्यवस्थेचे दुर्दैवच! शेती हा आपल्या उदरनिर्वाहाकरिता असलेल्या मुख्य स्रोतांपैकी एक. एवढेच नव्हे तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. म्हणूनच शेती करणार्‍या शेतकर्‍याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते. शासन कुणाचेही असो शेतकरी जगावा, संपन्न व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात येतात. आता तर केवळ शेतकरीच नव्हे त्याने उत्पादित केलेले अन्नधान्य सकस, आरोग्यदायी असावे म्हणून प्रयत्न केले जात आहेत. त्यात मुख्यत: आव्हान आहे ते रासायनिक शेतीमुळे जमिनीची पोत खालावल्याचे, रसायनयुक्त अन्नपदार्थ पोटात गेल्याने मानवाच्या आरोग्याचे. यावर उपाय म्हणून पारंपरिक सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका आहे. सेंद्रिय शेतीसाठी विविध महत्त्वपूर्ण पद्धतीमध्ये गोवंश आधारित शेतीची पद्धत आहे. ती टिकावी, जपावी म्हणून सर्वच समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. म्हणूनच शासनाने संपूर्ण गोवंश हत्या बंदी कायदा राज्यात लागू केला. पण कधी जिभेच्या चोचल्यासाठी तर कधी धर्मांध मानसिक वृत्तीतून गोवंशाची सर्रास कत्तल होते. कत्तल होण्यामागे धर्मांध वृत्ती अधिक कारणीभूत असल्याचे दिसून येते. बहुसंख्य हिंदू गायीला माता तर बैलाचे नंदी म्हणून पूजन करण्याची संस्कृती जपतात.  तर दुसरीकडे जिभेच्या चोचल्यांसाठी म्हणा की धर्मांध विकृत मनोवृत्तीतून गोवंशाची सर्रास कत्तल केली जाते. एका अर्थाने हा संस्कृती अन् विकृतीतील संघर्ष आहे.
 
For mass voters गत आठवड्यात चाळीसगाव येथून मुंबईला जाणार्‍या रेल्वेत कथित ‘मॉबलिंचिंग’ झाल्याचे म्हटले गेले. पण ही घटना का घडली? संघर्षाचे कारण काय? तर, एक व्यक्ती मांस घेऊन रेल्वेने प्रवास करीत होता. त्याच्या बोगीत अन्य सहप्रवासीही होतेच. त्या विशिष्ट समाजाच्या व्यक्तीजवळ असलेले मांस गोवंशाचे असल्याचे सहप्रवाशांना कळले. पवित्र श्रावण महिन्यात ज्या नंदीचे पूजन केले जाते त्या नंदी अर्थात बैलाचे मांस हा व्यक्ती नेतो आहे म्हणजेच याने किंवा याच्या भावबंदाने गोवंशाची कत्तल केली असल्याचे लक्षात येताच बोगीतील अनेकांनी उद्रेक सुरु केला. त्याला मारहाण करण्यात आली. अर्थात कायदा हातात घेऊन कुठल्याही मारहाणीचे समर्थन होऊच शकत नाही. पण मुळात राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असताना विशिष्ट समाजात दररोज गोवंशाची होणारी कत्तल अन् त्यावर न होणारी कारवाई याच संतापाचा येथे स्फोट झाला असावा. मारहाण करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड संतप्त झाले. पण आव्हाड साहेब आपण जसे त्याला झालेल्या मारहाणीकरिता संतप्त होत रक्त आटविले तसे त्याने बंदी असलेले गोवंश मांस कुठून आणले, याच्या चौकशीच्या मागणीकरिता पुढे येणार का? आता असे म्हणू नका की, त्याच्याकडे म्हशीचे मांस होते. कारण, म्हशीचे मांस सांगत कुठल्या मांसाची विक्री होते याची तुमच्यासह राज्यातील सर्वांना माहिती आहे. दुर्दैवाने आव्हाड काय किंवा अन्य तथाकथित धर्मनिरपेक्ष म्हणविणारे पुढारी काय, सर्वांचाच थयथयाट असतो केवळ गठ्ठा मतांसाठी. त्यापुढे त्यांना काहीच सुचत नाही, हेच खरे! मात्र, नजिकच्या काळात या गठ्ठा मतांसाठी थयथयाट करणार्‍यांना योग्य जागा दाखविण्याची वेळ येवून ठेपली आहे. 
 
-नीलेश जोशी  ९४२२८६२४८४
Powered By Sangraha 9.0