ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचे निधन

14 Sep 2024 20:30:45
मुंबई, 
journalist Vijay Vaidya : ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचे शनिवारी पहाटे मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले मोठा आप्तपरिवार आहे. विजय वैद्य यांची सुमारे ६० वर्षे पत्रकारिता केली. मुंबईतील ‘सकाळ’, ‘नवकाळ’सह अनेक मराठी दैनिकांमध्ये त्यांनी काम केले.
 
 
Vijay Vaidya
 
नंतर त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखक म्हणून काम केले. वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहिली आणि हरवलेली मुले शोधणे तसेच घटस्फोटितांना पुन्हा नवजीवन सुरू करण्यास मदत करणे यासारख्या सामाजिक कार्यातही त्यांचा हिरिरीने होता. विजय वैद्य यांनी यापूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, ठाणे जिल्हा पत्रकार संघ आणि मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघाचे सलग तीन वर्षे अध्यक्षपद भूषवले होते. ते सध्या उत्तर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष होते.
वैद्य यांची आगळीवेगळी अंतिम इच्छा
journalist Vijay Vaidya वैद्य यांनी त्यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव निधन झाले त्या दिवशीच्या गुंडाळले जावे आणि दुःखाने नव्हे, तर आनंदाने अन्त्यसंस्कारासाठी नेण्यात यावे, अशी इच्छा व्यक्त केली होती, अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी सांगितली. सामाजिक आणि पत्रकारितेतील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0