आग्रा,
suicide video इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये समोर आली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपल्या मृत्यूसाठी पत्नी आणि सासूला जबाबदार धरले आहे.
पत्नी आणि सासूने आपले आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे तरुणाने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या दोघांना सोडू नका, suicide video असे या तरुणाने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून आवश्यक कारवाई सुरू आहे. दुष्यंत गौतम (३२) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सौजन्य : सोशल मीडिया
दुष्यंतने गळफास लावून आत्महत्या केली पण तसे करण्यापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर लाइव्ह व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की, त्याच्या मृत्यूचे कारण त्याची पत्नी आणि सासू आहे. suicide video त्याच्या सासूने त्याची पत्नी आणि मुलांना हाकलून लावले आहे, ज्यामुळे त्याला खूप वेदना होतात. व्हिडिओमध्ये दुष्यंत म्हणाला की, "मी भित्रा नाही, माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नी आणि सासूला सोडू नका." पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह. कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दिलेली नाही. तक्रार आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.