दोन दिवसांचा वेळ कशाला हवा?

    दिनांक :15-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
Shahzad Poonawala : राजीनामा देण्यासाठी दोन दिवसांचा आणि शासकीय निवासस्थान सोडण्यासाठी १५ दिवसांचा वेळ हवाच कशाला? अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या पत्नी सुनीता यांना मुख्यमंत्री करायचे असेल आणि त्यासाठी पक्ष नेते व कार्यकर्त्यांची सहमती मिळविण्याकरिता दोन दिवस लागणारच. शिवाय, शासकीय निवासस्थानात भ्रष्टाचाराचे काही पुरावे लपवून ठेवले असू शकतात, ते बाहेर काढण्यासाठीही हवाच असतो, असा खोचक सवाल भाजपाने केला.
 
 
Shahzad Poonawala
 
दिल्लीतील जनतेच्या दरबारात केजरीवालांना जाण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते कारागृहात असताना, दिल्लीकरांनी लोकसभेच्या सर्व सातही जागा भाजपाच्या पदरात टाकून आपला निर्णय कळविला आहे, अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते Shahzad Poonawala शहजाद पूनावाला यांनी केजरीवालांवर हल्ला चढविला. कनिष्ठ न्यायालयापासून सुप्रीम सर्वच न्यायालयांनी केजरीवाल हेच मद्य घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे मान्य केले आहे आणि ही सत्यता आता लपून राहिलेली नाही. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणे इतके सोपे नाही, याची कल्पना असल्यानेच केजरीवाल यांनी आता भावनात्मक खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री असूनही कुठलेही काम करण्यास न्यायालयाने बंदी घातली असल्याने आता फक्त देखावा मंत्री बनले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीकरांसाठी काहीच निर्णय घेतले नाही तर आपल्याला कुणीही मत देणार नाही, याची जाणीवही त्यांना असल्याने त्यांनी राजीनाम्याची नौटंकी केली आहे, असा आरोप पूनावाला यांनी केला.