माणुसकीची, लोकशाही मूल्ये जपण्याची अपेक्षा व्यर्थच!

15 Sep 2024 05:04:25
कटाक्ष
 
- गजानन निमदेव
Violent TMC-West Bengal मान कधीही झुकणार नाही, मस्तिष्क भयमुक्त राहील आणि संपूर्ण समाज हा एकसंध राहील, अशी कल्पना ज्यांनी आपल्या काव्यप्रतिभेतून केली होती, त्या जागतिक ख्यातीचे कवी रवींद्रनाथ टागोर यांना आजची परिस्थिती पाहून किती वेदना होत असतील याची कल्पनाही न केलेली बरी! Violent TMC-West Bengal स्वत:चे स्वार्थी, संकुचित राजकारण यशस्वी करण्यासाठी रवींद्रनाथांची ही आभाळाएवढी उंच कल्पना मातीत घालताना ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला, डाव्या विचारसरणीच्या राजकीय नेत्यांना लाज आणि खंत कशी वाटत नाही, याचेही आता आश्चर्य वाटेनासे झाले आहे. बंगाली जनतेने सलग तीस वर्षे डाव्यांची अत्याचारी राजवट अनुभवली. तिला कंटाळून जनतेने ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास टाकला. पण, ममतांनीही भ्रमनिरास केला आहे. Violent TMC-West Bengal रवींद्रनाथांची नीतिमूल्ये, त्यांचे विचार पायदळी तुडविण्यात धन्यता मानणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोधी विचारधारेच्या लोकांवर अनन्वित अत्याचार केले आहेत. त्यांनी बंगालमध्ये राहूच नये, असे वातावरण तयार केले आहे. विशेषत: लोकसभेच्या निवडणुका झाल्यापासून भाजपाच्या कार्यकर्त्यांवर आणि संघाच्या स्वयंसेवकांवर, हिंदूंवर जे अत्याचार सुरू आहेत, ते मानवतेला काळिमा फासणारे आहेत.
 
 
 

 Violent TMC-West Bengal  
 
 
 
Violent TMC-West Bengal बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वत:ची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना हाताशी धरले, हे फारच दुर्दैवी होय. बंगालमध्ये मुस्लिमांची संख्या ३२ टक्के आहे. ही अधिकृत आकडेवारी आहे. हिंदू नावे धारण करून अनधिकृतपणे राहणारे बांगलादेशी घुसखोर मुस्लिम किती आहेत, त्याची तर कल्पनाही न केलेली बरी. लोकसभेची निवडणूक जिंकता यावी, पश्चिम बंगालच्या विधानसभेतही भाजपाला बहुमत मिळावे, यादृष्टीने भाजपाने प्रभावी उपाययोजना आखली होती. पण, धार्मिक कट्टरवादाने भाजपाचे स्वप्न उधळून लावले. Violent TMC-West Bengal कधीकाळी बंगालवर अनभिषिक्त सत्ता गाजवणाऱ्या कम्युनिस्टांनी त्यांची मते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलकडे वळवली. जे कम्युनिस्टांनी केले, तेच काँग्रेसनेही केले. बंगालमध्ये एकदा का भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर भाजपाला सत्तेबाहेर करणे अवघड होऊन बसेल, असा विचार करून या दोन्ही पक्षांनी स्वत:चे अस्तित्व गहाण ठेवत ममतांना पुन्हा सत्तेत आणले, हे वास्तव आहे. केंद्रात २०१४ सालापासून भाजपाचे सरकार आहे. Violent TMC-West Bengal मध्यप्रदेश (मधला अपवाद वगळता), गुजरात या राज्यांमध्ये कित्येक वर्षे झाली काँग्रेसला सत्तेत प्रवेश मिळालेला नाही.
 
 
 
तिथे दीर्घकाळापासून भाजपाची सत्ता आहे. कारण, जनतेच्या हिताचे निर्णय करणाऱ्या भाजपाला लोकांची पसंती असते. म्हणूनच बंगालमध्ये एकदा का भाजपाची सत्ता आली तर तिथे लोकोपयोगी कामे होतील, बंगालचा औद्योगिक विकास झपाट्याने होईल, तिथल्या लोकांचे दारिद्र्य दूर होईल आणि संपन्नता येईल. Violent TMC-West Bengal असे झाले तर लोक पुन्हा पुन्हा भाजपालाच निवडून देतील, या भीतीने ग्रासलेल्या काँग्रेस आणि कम्युनिस्टांनी त्यांची मते ममता बॅनर्जी यांच्याकडे वळवल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. आपण आलो नाही तरी चालेल, पण भाजपा येता कामा नये, ही या पक्षांची धारणाच मुळात लोकशाहीला मारक आहे. वास्तविक, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक प्रचंड मताधिक्क्याने जिंकण्याची व्यूहरचना भाजपाने अतिशय प्रभावी रीतीने केली होती. पण, विरोधकांच्या लांगुलचालनाच्या राजकारणाने भाजपाची व्यूहरचना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. Violent TMC-West Bengal भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि कम्युनिस्टांनी स्वत:चे अस्तित्व पणाला लावले, ही बाबही लोकशाहीची थट्टा आहे. राजकारणात असणाऱ्या राजकीय पक्षांनी प्रामाणिकपणे निवडणुका लढणे अपेक्षित असते. पण, देशात सध्या राजकारणाचा जो कल दिसतो आहे, तो भाजपाला एकटे पाडण्याचा आहे.
 
 
 
 
सगळे मिळून भाजपाला पाण्यात पाहात आहेत. मोदींसारखा मजबूत नेता भाजपाकडे आहे, सातत्याने भाजपाला यश मिळत आहे, ही बाब विरोधकांना चिंता करायला लावणारी आहे. असो. ममतांच्या बंगालमध्ये सध्या जी प्रचंड दहशत आहे, विशेषत: भाजपा आणि संघाचे समर्थन करणाऱ्या हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना आहे, ती काळजी वाढवणारी आहे. Violent TMC-West Bengal कारण, राज्याच्या प्रमुख असलेल्या ममता बॅनर्जी यांना आपल्या राज्यातील हिंदूंपेक्षा बांगलादेशी घुसखोरांची काळजी आहे. त्यांच्या कृतीवरून ते दिसूनही आले आहे. खबरदार, बांगलादेशी घुसखोरांना कुणी हात लावलात तर, असा इशाराही ममता बॅनर्जी यांनी गतकाळात दिला होता. ममता बॅनर्जी या हुकूमशाही वृत्तीच्या नेत्या आहेत. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्याला त्या सोडत नाहीत. बंगालमध्ये भाजपाच्या कित्येक नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले झालेत, त्यात अनेकांचा मृत्यूही झाला. हल्ले करणारे बांगलादेशी घुसखोर आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्तेच आहेत, हे लपून राहिलेले नाही. आजही बंगालमधील तृणमूलविरोधक हिंदू समाजमन भयकंपित आहे. कारण, मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत.
 
 
 
Violent TMC-West Bengal एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असताना, निष्पाप लोकांच्या हत्या होत असताना स्वयंघोषित पुरोगामी निषेधाचा एक शब्दही काढायला तयार नाहीत. पत्रकारितेतही काही स्वयंघोषित पुरोगामी आहेत. ते स्वत:च्या सोयीनुसार लेखणी चालवत असतात. भाजपाशासित राज्यांमध्ये कुठे खुट्ट जरी वाजले तरी यांचे कान टवकारलेले असतात आणि लिहिण्यासाठी लेखणी सिद्ध झालेली असते. पण, भाजपेतर राज्यात कितीही हत्या झाल्यात, कितीही लोकांच्या घरांना आगी लावल्या गेल्यात तरी ही मंडळी मिठाची गुळणी करून गप्प बसली असतात. यांच्या लेखणीची आणि वाणीची धार बोथट झालेली असते. ममता बॅनर्जी दिल्लीचा दौरा करतात, पत्रकार परिषद घेतात तेव्हा बंगालमधील हिंसाचाराविषयी एकही पत्रकार त्यांना साधा प्रश्नदेखील विचारत नाही, यावरून पुरोगामी पत्रकार किती प्रतिगामी आहेत, हे सहज लक्षात येते. पुरोगामी लोक कधीही एकाची बाजू घेत नाहीत. ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असतात. ते कधीच कुणाचा द्वेष करीत नाहीत. मात्र, डाव्यांनी ज्यांना उजवे ठरवले आहे, त्या जमातीच्या एखाद्या पत्रकाराने प्रश्न विचारण्याचे धाडस जरी दाखवले, तर त्याला एकाकी पाडण्यासाठी स्वयंघोषित पुरोगामी पत्रकारांची फौज एकवटली असते, हे निश्चित!
 
 
 
Violent TMC-West Bengal याउलट, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जेव्हा जेव्हा पत्रकार परिषदा घेतात, तेव्हा जाणीवपूर्वक त्यांना उत्तरप्रदेशातील कथित घटनांबाबत प्रश्न विचारून सतावून सोडले जाते, जाणूनबुजून हिंदू-मुस्लिम शब्द वापरात आणले जातात आणि त्यांच्या तोंडून अनवधानाने एखादा वेगळा शब्द निघाला तर त्याचे भांडवल करून भाजपाला आणि कारण नसताना संघ परिवाराला वादात अडकवण्याचे कारस्थान केले जाते. हा अनुभव आहे. बंगालमध्ये हजारो निष्पाप लोकांची हत्या झाली, असंख्य लोकांना पलायन करावे लागले, अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले, गेल्या चारपाच महिन्यांत असंख्य लोकांना धमकावण्यात आले. जगविख्यात कवी रवींद्रनाथ टागोरांच्या राज्यात या घटना घडल्या आहेत. कुणी घडवून आणल्या, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. सत्तेसाठी काहीही करायला तयार असलेल्या ममता बॅनर्जी यांनी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसने लोकशाही मूल्ये पायदळी तुडविली आहेत. व्वा ममता बॅनर्जी! आता तुम्हाला दीदी म्हणण्याचीही लाज आम्हाला वाटायला लागली आहे.
 
 
 
Violent TMC-West Bengal तुम्हाला दीदी म्हणावे असे कोणतेही चांगले वर्तन तुमच्याकडून घडताना दिसत नसल्याने तुमची दीदी ही उपाधी आम्ही काढून घेत आहोत, असे ठासून सांगण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर आणि आताही तृणमूलच्या गुंडांनी केलेला अत्याचार ममतांना दिसला नाही. हा अत्याचार म्हणजे भाजपाचे नाटक असल्याचा कांगावा करताना ममतांना थोडी लाजही कशी वाटली नाही. एक महिला एवढी क्रूर कशी असू शकते? बंगालमध्ये मिळालेल्या पाशवी विजयानंतर तृणमूलच्या गुंडांनी प्रचंड मनमानी करीत हिंसाचार केला, भाजपाच्या कार्यकत्र्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले, त्याबाबत कुणी काही बोलायचेही नाही? ममता, काँग्रेस, डावे यांना सामान्य माणसाशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना त्यांची राजकीय पोळी शेकायची आहे, आपला उल्लू सीधा करून घ्यायचा आहे. म्हणूनच मोदीविरोधाने आंधळे झालेल्या कुणाकडूनही माणुसकीची, लोकशाही मूल्ये जपण्याची कसलीही अपेक्षा करणे व्यर्थच!
Powered By Sangraha 9.0