साप्ताहिक राशिभविष्य
मेष: संथ गतीने व्यवहार घडतील
Weekly Horoscope : वक्रतुंड श्रीगणेशाच्या उत्सवाने परिपूर्ण या आठवड्यात भ्रमण आपल्या कुंडलीतील दशम स्थानातून सुरू होत आहे. अशातच राशिस्वामी मंगळ पराक्रमात असून चंद्राशी त्याचे षडाष्टक होत आहे. यामुळे हा आठवडा आपणास कुटुंब व कार्यक्षेत्रात संमिश्र योग देणारा ठरावा. आपली नोकरी-व्यवसायातील कामे काहीशा संथ गतीने पुढे सरकत असल्याचे जाणवेल. विशेषतः युवावर्गाला सध्यातरी नोकरी वा तत्सम कार्याच्या संबंधाने काही काळ पाहावी लागू शकते. घर, जमीन-जुमल्याचे व्यवहार लांबतील. काहींना प्रवास घडू शकतो.
हेही वाचा : आसाममध्ये आज मोबाईल इंटरनेट सेवा बंद शुभ दिनांक -१७, १८, १९, २०.
वृषभ : मंगलमय घटनाक्रम संभव
एकदंत श्री गणेशाच्या उत्साहपूर्ण सान्निध्यातील या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील नवम या भाग्य स्थानातून सुरू होत आहे. त्याचवेळी राशिस्वामी शुक्र पंचम या शुभस्थानी असून शुभंकर गुरू आपल्या आहे. हे आनंददायी व भाग्योदयकारक ग्रहयोग आपल्या जीवनात मंगलमय घटनाक्रमाची पेरणी करू या सप्ताहात करू शकतील असे वाटते. युवावर्गाला जीवनाचा साथीदार लाभू शकेल, किमान त्या दिशेने सुरू असलेल्या हालचालींना वेग येईल. व्यवसाय विस्ताराच्या योजना हाती घेऊ शकता. गुंतवणुकीत फायदा होऊ शकेल. नवीन संकल्पना राबवून व्यवसाय अधिक आकर्षक व सफल शकाल.
शुभ दिनांक - १५, १६, २०, २१.
मिथुन: संघर्ष व प्रतीक्षा वाट्याला येणार
Weekly Horoscope : कृष्णपिंगाक्ष श्री गणेशाच्या आनंदमय वास्तव्याने युक्त या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील अष्टम या काहीशा पीडादायक स्थानातून सुरू होत आहे. आपल्या राशीत मंगळ आहे तर राशिस्वामी बुध पराक्रम स्थानी आहे. विशेषतः नोकरी-व्यवसायात अनुकूल वातावरण करण्यासाठी सध्याचे ग्रहमान उपयुक्त ठरत असले, तरी त्यात संघर्ष व काहीशी प्रतीक्षाही वाट्याला येणारच आहे, हे लक्षात घ्यावे. काहींना सप्ताहाच्या अखेरीस नवीन जबाबदारी स्वीकारावी लागू शकते. मात्र त्याचे दीर्घकालीन लाभ पुढे मिळतील. या सप्ताहात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वाहने सांभाळून चालवा.
शुभ दिनांक - १६, १७, १८, १९.
कर्क : व उत्साही वातावरण
गजवक्त्र श्री गणेशाच्या उत्सवाची धामधूम असलेल्या या आठवड्यात आपला राशिस्वामी चंद्र कुंडलीतील सप्तम स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे. हे कौटुंबिक सुखाचे, जोडीदाराचे व व्यवसायातील यशाचे स्थान आहे. त्यामुळे या सप्ताहात यानुषंगाने धावपळ, कामांची लगबग, नातेवाईकांच्या भेटीगाठी, प्रवासाचे योग असा अतिशय गर्दीचा काळ ठरू शकतो. मात्र या आनंदाचे क्षण आपल्या गाठीस जमा होत राहतील. नोकरीत आकस्मिक घडामोडी घडू शकतात. एखादी विशेष जबाबदारी सोपविली जाणे किंवा कामाच्या स्वरूपात बदल घडणे संभवते. विवाहयोग्य मुला-मुलींचे कार्य जुळून येऊ शकतील.
शुभ दिनांक - १६, १७, २०, २१.
सिंह: आर्थिक आवक वाढेल
Weekly Horoscope : लंबोदर श्री गणेशाच्या सुखावह उत्सवाच्या या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण षष्ठ या दुय्यम कर्मस्थानातून सुरू होत आहे. त्याचवेळी आपला राशिस्वामी रवी हा धनेश बुधासोबत उत्तम योग करीत आहे. यामुळे नोकरी-व्यवसायात उत्तम वातावरण निर्माण व्हावे. संपूर्ण कुटुंबाचीच आर्थिक आवक वाढावी. कुटुंबात आनंद व उत्साहाचे, सहकार्याचे वातावरण राहील. आपल्या प्रगतीला चालना देणार्या काही घटना या आठवड्यात घडू शकतात. व्यवसाय विस्तार, गुंतवणूक करता येऊ शकेल. सरकारी नोकरीत किंवा खाजगी क्षेत्रात असणार्यांना आर्थिक लाभ संभवतो.
शुभ दिनांक - १६, १८, १९, २०.
कन्या : प्रगतिकारक घटनाक्रम संभव
विकट स्वरूप श्री गणेशाच्या उत्सवाने युक्त या मंगलमय आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील पंचम या शुभ स्थानातून सुरू होत आहे. याचवेळी आपला राशिस्वामी व्ययात व रवी आपल्या राशीत असल्याने एक सुयोग निर्माण झाला आहे. याच्या प्रभावाने विशेषतः अचानक प्रवासयोग, काहींना विदेश गमनाच्या संबंधात उत्तम हालचाली घडून आणणारा हा आठवडा असू शकेल. व्यवसायात असलेल्यांना हा आठवडा प्रगतिकारक जावा. व्यवसायात काही नवे धाडस करता येऊ शकेल व त्याचे चांगले परिणाम मिळू शकतील. ज्येष्ठ मंडळींनी सध्या आरोग्याकडे करू नये.
हेही वाचा : बाप्पांना निरोप देताना...शुभ दिनांक - १५, १६, १७, २१.
तूळ : निर्णय घेताना सावध
Weekly Horoscope : विघ्नराजेंद्र श्री गणेशाच्या कृपेची आनंदवर्षा होणार्या या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील सुख स्थानातून सुरू होत आहे. अशातच राशिस्वामी शुक्र पीडाकारी अष्टमेश रवीसोबत व्यय स्थानी आहे. त्यामुळे हा सप्ताह आपणास संमिश्र जाण्याची शक्यता आहे. विशेषतः आर्थिक फटका देणारा, एखादी जिकरीची जबाबदारी लादणारा हा आठवडा ठरावा. व्यावसायिक करार, गुंतवणूक याबाबतचे निर्णय घेताना सावध राहावे. या राशीच्या युवा मंडळींना नोकरी व व्यवसायाच्या अनुषंगाने काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. नोकरीत असलेल्यांना सध्या हितशत्रूंबाबत सजग राहण्याची गरज आहे.
शुभ दिनांक - १५, १७, २०, २१.
वृश्चिक : अतिशय घडामोडी
धूम्रवर्ण श्री गणेशाच्या उत्सवामुळे आनंदी वातावरण लाभलेल्या या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीच्या पराक्रम स्थानातून सुरू होत आहे. अशातच राशिस्वामी मंगळ अष्टमात मात्र स्वराशीत असल्याने वेगवान आर्थिक घडामोडीचे वातावरण निर्माण करणारी ग्रहस्थिती आपल्या वाट्याला आलेली दिसते. तरुणांना नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम संधी चालून येऊ शकतात. काहींना विदेश गमनाची, संधी लाभेल. विवाहेच्छू मुला-मुलींचे शुभमंगल जुळण्याच्या हालचालींना वेग येईल. काहींना बाळाच्या आगमनाची चाहूल लागू शकते. कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. एकंदरीत उत्तम आठवडा राहील.
हेही वाचा : सोने झळाळणार, रोजगार वाढणारशुभ दिनांक - १६, १८, २०, २१.
धनु: सहज व शांत घटनाक्रम
Weekly Horoscope : भालचंद्र श्री गणेशाच्या कृपाद़ृष्टीने प्रसन्शन ठरणार्या या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील स्थानातून सुरू होत आहे. याचवेळी गुरू षष्ठ या कर्मस्थानात आहे. त्याचा चंद्राशी शुभयोग होत आहे. अतिशय सहज व शांतपणे काही चांगल्या घडामोडी घडून येण्यास उपयुक्त हा आठवडा दिसतो. आपल्या मनातील योजना या काळात कार्यान्वित करता येतील. तरुणांना नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम संधी लाभाव्यात. व्यवसायातील स्थिती समाधानकारक राहील. आर्थिक आवक वाढेल. तरुण वर्गाच्या विवाहाच्या दिशेने वेगवान हालचाली संभवतात. कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील.
हेही वाचा : आसाममध्ये आज मोबाईल इंटरनेट सेवा बंद शुभ दिनांक - १५, १६, १९, २१.
मकर: आर्थिक कामांना वेग मिळावा
विनायक श्री गणेशाच्या मंगलमय उत्सवाने युक्त या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या मकर या राशीतूनच सुरू होत आहे. याचवेळी आपला राशिस्वामी शनी धन स्थानी यामुळे या सप्ताहात विशेषत्वाने आपल्या आर्थिक व तत्संबंधी कामांना वेग मिळावा. नोकरी-व्यवसायात अधिकारी वर्ग किंवा वडीलधार्या मंडळींच्या सल्ल्याने काही मोठा पल्ला गाठण्याचे योग संभवतात. नोकरीत काहींना एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. त्यामुळे आपल्या योजना, नव्या संकल्पना राबविता येतील. कुटुंबातील विवाहेच्छू मुला-मुलींचे शुभमंगल जुळून येण्यासाठीच्या हालचालींना वेग येईल.
शुभ - १५, १६, १७, २०.
कुंभ : धाडसाचे कौतुक होईल
Weekly Horoscope : गणपती श्री गणरायाच्या उत्सवाने आनंदमय झालेल्या या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील व्यय स्थानातून सुरू होत आहे तर राशिस्वामी शनी आपल्याच राशीत आहे. ही काहीशी खर्चवृद्धी करणारी स्थिती असली तरी त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. नोकरीत काही जबाबदारीचे काम वाट्यास यावयास हवे. अधिकार्यांची विशेष, मर्जी संपादन करता येईल. व्यवसायात आपल्या एखाद्या आर्थिक धाडसाचे कौतुक होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना संधी लाभावी. सप्ताहाच्या उत्तरार्धात कामाचा उत्साह दुणावेल. उत्पन्नात वाढ होईल. आपल्या कामगिरीचे कौतुक होईल. कुटुंबाचे व मित्रांचे सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक - १७, १८, १९, २१.
मीन : योजनांना बळ मिळावे
Weekly Horoscope : श्री गणेशाच्या या सुमंगल उत्सवामुळे या आनंदपुरीत आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील लाभ स्थानातून सुरू होत आहे. आतापर्यंतच्या काहीशा कटकटीच्या व क्लेषयुक्त वातावरणात दिलासा देणारा हा आठवडा राहावा. आपल्या योजनांना बळ मिळू शकेल. कुटुंबातून मन प्रसन्न करणार्या वार्ता कानी येऊ शकतील. मुलांचा उत्कर्ष आनंद देईल. व्यवसाय व नोकरीत समाधान लाभणार असले, तरी दुसर्यावर विसंबून राहता येणार नाही. कामाचे व वेळेचे सुयोग्य नियोजन करणे फायद्याचे ठरेल. कुटुंबात युवा मंडळींच्या नोकरी, व्यवसाय, विवाहादी कार्याच्या संबंधाने काही चांगल्या हालचाली घडतील.
शुभ दिनांक - १५, १६, १९, २०.
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, ८६००१०५७४६