हृदयद्रावक! बांगलादेशातून महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा video व्हायरल

15 Sep 2024 15:16:11
ढाका,   
Bangladesh video बांगलादेशातील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रसिद्ध कॉक्स बाजार येथील असून या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. जमात-ए-इस्लामीची विद्यार्थी शाखा इस्लामी छात्रशिबिरचे सदस्य इस्लामिक ड्रेस कोड न पाळणाऱ्या महिलांना लक्ष्य करत असल्याचा दावा व्हिडिओमध्ये केला जात आहे. पुरुषांचा जमाव महिलांना केवळ लाठ्या मारत नाही तर त्यांना उठक बैठक करायला पण लावत आहे.
हेही वाचा : टीम इंडियातून शुबमन गिलचा पत्ता कट होणार? 
Bangladesh video
 
शिबीर केडर म्हणून ओळखला जाणारा फारुख इस्लाम हा बुरखा न घालणाऱ्या किंवा एकट्या फिरणाऱ्या महिलांना लाठ्या-काठ्या घेऊन मारहाण करण्यात गुंतला आहे, त्यामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. Bangladesh video सोशल मीडिया साइटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये महिलांना टार्गेट केले जात आहे, ज्यामध्ये एका महिलेला मारहाण केली जात आहे तर दुसऱ्या महिलेला सिट-अप करायला लावले जात आहे. हेही वाचा : मोहम्मद मुइज्जूने भारतात येण्यापूर्वी खेळला 'Double Game'
चितगावमधील चुनती हकीमिया कामिल मास्टर्स मदरसाशी संबंधित इस्लामने हल्ल्याची नोंद केली आणि फेसबुकवर पोस्टही केली. बांगलादेशातील दहशतवादाच्या वाढत्या लाटेमुळे भीती निर्माण झाली आहे आणि काहींनी त्याची तुलना तालिबानच्या नियंत्रणाखालील अफगाणिस्तानशीही केली आहे. Bangladesh video हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र चिंतेची लाट पसरली आहे. कट्टरतावादाच्या वाढत्या भीतीमुळे देशातील महिलांच्या सुरक्षेबाबतच नव्हे तर धार्मिक स्वातंत्र्याबाबतही चिंता निर्माण झाली आहे. बांगलादेशातील राजकीय संकटाच्या वेळी हा हल्ला झाला आहे कारण माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर झालेल्या राजकीय बदलांमुळे अशांतता आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे.
Powered By Sangraha 9.0