गोदावरी अर्बनला ‘सहकार भूषण’ पुरस्कार

16 Sep 2024 20:43:01
यवतमाळ, 
'Sahkar Bhushan' Award to Godavari Urban महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, तेलंगण, कर्नाटक व या राज्यांत सहकार रुजविण्यात व वाढविण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल नॅशनल मल्टिस्टेट फेडरेशनच्या वतीने गोदावरी अर्बनला ‘सहकार भूषण’ पुरस्काराने शिर्डी येथे सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार केंद्रीय सहकार सचिव डॉ. आशिष भूतानी, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार सहनिबंधक संभाजी निकम, राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते संस्थेचे व्यवस्थापकीय धनंजय तांबेकर यांनी सर्व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत स्वीकारला.
 
 

goda 2
 
यावेळी मल्टिस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्कार सोहळ्यात संस्थेचे उपसरव्यवस्थापक रवी इंगळे, मार्केटिंग मॅनेजर महेश केंद्रे, वणी शाखा व्यवस्थापक विजय मोडक, वर्धा शाखा व्यवस्थापक चंद्रशेखर कामडी, सहायक व्यवस्थापक गजानन सूर्यवंशी, एकनाथ विभुते, व्यवस्थापक अतिश कोमटवार, हिंगणघाट शाखाधिकारी कुंदन वेले, माहूर शाखाधिकारी गोपाळ खोडके, कुरुंदा विस्तारित शाखाधिकारी गोपीराज दळवे, अर्धापूर शाखाधिकारी सोमेश संगेवार, सिडको शाखाधिकारी गजानन पाटील, अकोला शाखाधिकारी निखिल जुराफे उपस्थित होते.
 
 
'Sahkar Bhushan' Award to Godavari Urban गोदावरी अर्बनने सहकार क्षेत्रात कोणतीही स्पर्धा न करता कायमच आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवण्याचा विक्रम केला आहे. संस्थेने कायमच केंद्रबिंदू मानून विविध योजना राबवल्या आहेत. त्यांना आर्थिक साक्षर करून त्यांच्यामध्ये आर्थिक शिस्त रुजविण्यात संस्थेचे मोलाचे योगदान आहे. ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कायमच दर्जेदार सेवा देण्यासाठी संस्था कार्य करीत आहे. या पुरस्काराबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार हेमंत पाटील, अध्यक्ष राजश्री पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, समस्त ग्राहक व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
Powered By Sangraha 9.0