धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून

    दिनांक :16-Sep-2024
Total Views |
- महाप्रसादादरम्यान उद्भवला वाद
- आर्णीच्या संभाजीनगरातील घटना

आर्णी, 
Badal Tale : महाप्रसाद घेत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून वाद घालून एका तरुणाला चार ते पाच आरोपींनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत संबंधित तरुण गंभीर जखमी झाला. त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास येथील संभाजीनगरात घडली.
 
 
Badal Tale
 
Badal Tale : बादल केशव टाले (वय २३, कंबलपोष लेआउट) असे निर्घृण खून तरुणाचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी संभाजीनगर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बादलही गेला होता. तेथे त्याने क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ सुरू केली. यावेळी महाप्रसाद घेताना त्याचा आकाश डोईफोडे या तरुणाला धक्का लागला. आकाश त्याला समजावत असताना त्याला बादलने मारहाण केली.
 
 
Badal Tale : त्यानंतर आकाश व त्याच्यासोबत एक अल्पवयीन मुलाने बादलला केली. त्याचे डोके भिंतीवर व सिमेंट रोडवर आपटून त्याला गंभीर जखमी केले. त्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला व तो कोसळला. त्याला मावसभाऊ आकाश ठोंबरेने रुग्णालयात आणले असता त्याला मृत घोषित केले. पोलिस घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मारेकर्‍यांची माहिती मिळवून दोन संशयितांना अवघ्या २० मिनिटांत ताब्यात घेतले. पोलिसांनी आकाश डोईफोडे (२८) व एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला. ठाणेदार केशव ठाकरे व सहपोलिस निरीक्षक सागर दानडे, संदीप ढेंगे, आकाश शेळके अधिक तपास करत आहेत.