गोंदिया,
Gondia-Swachata hi Sewa स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यातील 868 गावांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून गावागावांतील ‘ब्लॅकस्पॉट’ हद्दपार करण्यात येणार आहे. सन 2017 पासून स्वच्छता ही सेवा या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावर्षी ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ ही थीम घेऊन विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश केंद्र व राज्य शासनाने दिले आहेत. या उपक्रमातून मुख्यतः तीन ठळक मुद्यांवर भर देण्यात आला आहे. यात स्वच्छतेची भागिदारी, संपूर्ण स्वच्छतेअंतर्गत स्वच्छतेचे लक्षीत गटांची स्वच्छता व सफाईमित्र सुरक्षा शिबीराचा समावेश आहे.
Gondia-Swachata hi Sewa या तीन उपक्रमातंर्गत तारखेनिहाय नियोजनानुसार विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यानुसार आज, 17 सप्टेंबरला उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी स्वच्छतेची शपथ घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. तर 18 सप्टेंबरला सफाईमित्र सरक्षा शिबीर, 19 सप्टेंबरला एक दिवस श्रमदानासाठी यातंर्गत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिम, 20 सप्टेंबर खाऊगल्लीमध्ये स्वच्छता, एकल प्लॉस्टीक न वापरण्याबाबत जनजागृती, शून्य कचरा उपक्रम, एक झाड आईच्या नावे, स्वच्छता रॅली, शाळांमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
Gondia-Swachata hi Sewa स्वच्छता संवाद व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या प्रकल्पांचे उद्धाटन, 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छता प्रतिज्ञा व 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज, 16 सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश सर्व गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गटसंसाधन केंद्रातील कर्मचार्यांची बैठक घेऊन दिले.