मिझोरममध्ये कोट्यवधींचे हेरॉईन जप्त

    दिनांक :16-Sep-2024
Total Views |
ऐझवाल, 
Heroin seized in Mizoram : मिझोरमच्या चम्फाई जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या कारवाई करीत आसाम रायफल्सने २७६ ग्रॅम हेरॉईन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात याचे मूल्य १.९ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती दलाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात दिली.
 
 
Heroin seized
 
Heroin seized in Mizoram : चम्फाईच्या मेलबुक आसाम रायफल्सने केलेल्या पहिल्या कारवाईत १२९ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. याचे मूल्य ९० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. दुसरी कारवाई मिझोरम-म्यानमार सीमेवरील झोखावथार येथे करण्यात आली. येथे एक कोटी रुपयांचे १४७ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, मिझोरम पोलिसांनी ५९२ ग्रॅम हेरॉईन म्यानमारमधील नागरिकाकडून जप्त केले होते.