पारंपरिक वाद्यांनी मिरवणूक काढा : जिल्हा पोलीस अधीक्षक

    दिनांक :16-Sep-2024
Total Views |
- दिग्रसला शांतता सभेची बैठक

दिग्रस, 
गणेशोत्सव हा स्वतंत्र काळापासून चालत आला आहे, उत्सवाची संकल्पना विसरु नका. मिरवणूक काढताना अनेक प्रकार हे अशोभनीय आढळून येतात. कर्णकर्कश आवाजातील डिजे, त्यावर नको ते गाणे अश्या पद्धतीने गणरायाला निरोप न देता पारंपरिक वाद्यांनी मिरवणूक काढा एक आदर्श प्रस्थापित मी स्वतः सहभाग घेतो, तर इद ए मिलादची मिरवणूकही वेळेतच काढा, ९५ टक्के लोक हे चांगले असतात, त्यात घोळ फक्त पाच टक्केच लोकांमुळेच होतो, त्यांना आवरा असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक Kumar Chinta कुमार चिंता यांनी शांतता सभेच्या बैठकीत केले.
 
 
chinta
 
Kumar Chinta दिग्रस व आर्णी पोलीस ठाण्याच्या पुढाकारात शनिवार, १४ सप्टेंबरला, गणेशाच्या विसर्जन व इद ऐ मिलादच्या मिरवणूक संदर्भात शांतता समितीची बैठक येथील शगून मंगल कार्यालयात घेण्यात आली. दिग्रस व आर्णी येथील शांतता समितीचे सदस्य व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक दिग्रसचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी, तर संचालन पोलिस पाटील रवीशंकर ढोले यांनी केले. या प्रसंगी मिरवणूक दरम्यान अडचणींवर सुचना त्यावरील निराकरण करण्यात आले मिरवणूक शांततेत पार होतील अशी ग्वाही मंडळांच्या व शांतता समिती सदस्यांनी दिली. सभेत दारव्हा उपविभागीय पोलिस अधीक्षक चिलुमुला रजनीकांत, तहसीलदार मयूर राऊत व आर्णीचे ठाणेदार केशव ठाकरे उपस्थित होते.