सामाजिक बांधिलकी जोपासणे ही एक सोशल इंजिनीअरींगच : मंदार पत्की

    दिनांक :16-Sep-2024
Total Views |
- अभियंता दिनी सोलर रू\ टॉपने शाळा प्रकाशमान

यवतमाळ, 
Mandar Patki : समाजालाही आपले देणे लागते याची जाणीव ठेवत महावितरणच्या अभियंत्यांनी ‘इंजिनिअर्स डे; निमित्त तालुक्यातील पारवा जिल्हा परिषद शाळेला सौर ऊर्जेतून प्रकाशमान करण्याचा स्तुत्य उपक्रम म्हणजे सोशल इंजिनिअरींगच आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले. पारवा येथील जिल्हा परिषद शाळेच्या छतावर उभारण्यात आलेल्या ‘रू\ टॉप सोलर;च्या लोकार्पणानिमित्त ते बोलत होते. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता पुरूषोत्तम चव्हाण, मुख्याध्यापक मीनाक्षी शिरभाते, उपकार्यकारी अभियंता प्रवीण फुलझेले यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
parva
 
Mandar Patki : इंजिनिअर विविध क्षेत्रांत काम करतात आणि ते तांत्रिक ज्ञान वापरून समाजातील समस्या सोडवतात. समाजातील प्रगतीत आणि विकासात इंजिनीअरचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे महावितरण यवतमाळ येथील महावितरणच्या अभियंत्यांनी सोशल इंजिनिअरींग करत स्व:खर्चाने पारवा येथील जिल्हापरिषद शाळेवर १ किलो वॅटची रू\ टॉप सोलर यंत्रणा बसविली, हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले. अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली म्हणाले, समाजानेच व्यक्तीला मोठे केले आहे. त्यामुळे त्या समाजाची परतफेड करण्याची जबाबदारी हे कर्तव्य मानत भविष्यातही असेच योगदान देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.