इम्फाळ,
Manipur: Grenade attack मणिपूरचे मंत्री काशिम वाशूम यांच्या घरावर संशयित बंडखोरांनी ग्रेनेड हल्ला केला. यात कुणीही जखमी झाले नसले, तरी त्यांच्या संपत्तीचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही. ग्रेनेडचा स्फोट झाला, त्यावेळी मी आणि माझे कुटुंबीय घरी नव्हतो, असे वाशूम यांनी सांगितले. ग्रेनेडच्या स्फोटामुळे घराची भिंत आणि इतर भागांचे नुकसान झाले. घटनास्थळावर ग्रेनेडमधील छर्रे आढळले.
Manipur: Grenade attack ग्रेनेड हल्ल्यानंतर येथील सुरक्षा वाढवण्यात आली, असे अधिकार्याने सांगितले. या प्रकरणाच्या तपासाचा म्हणून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारली नाही. वाशूम हे नागा पीपल्स फ्रंटचे (एनपीएफ) आमदार आहेत. हा पक्षा सत्ताधारी भाजपाचा सहकारी पक्ष आहे. दरम्यान, तंगखूल नागा या आदिवासी समुदायाची तंगखूल नागा लाँग या सर्वोच्च संघटनेने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि यातील कटकर्त्यांच्या गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली.