नवी दिल्ली,
कार्यसंस्कृतीच्या दाव्यांबाबत ४ सप्टेंबर रोजी जारी केलेले प्रसिद्धीपत्रक भांडवली बाजार नियामक SEBI सेबीने सोमवारी मागे घेतले. या चिंता चुकीच्या आहेत आणि कर्मचारी संबंध समस्या आंतरिकरीत्या व्यवस्थापित केल्या जातील, असे सेबीने म्हटले आहे.
प्रसिद्धीपत्रक जारी केल्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे ५ सप्टेंबर रोजी सेबीच्या कर्मचार्यांनी मोठ्या संख्येने या विरोधात निदर्शने केली होती. प्रसिद्धीपत्रक मागे घेण्यात यावे आणि सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बूच यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कर्मचार्यांनी केली होती. भारतीय प्रतिभूती बाजाराला जागतिक पातळीवर सुनियमित बाजार बनवण्यासाठी SEBI सेबीच्या कर्मचार्यांनी मागील ३६ वर्षांपासून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे, असे सेबीने हे पत्रक मागे घेताना म्हटले.