शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य आकार देतो : तहसीलदार वैशाख वाहुरवाघ

    दिनांक :16-Sep-2024
Total Views |
आर्णी, 
शिक्षकांमुळे विद्यार्थ्याचे जीवन बदलून जाते. विद्यार्थ्यांच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून त्यांना ज्ञानाचा प्रकाशात आणण्याचे महान कार्य शिक्षक करतात. आपल्या जीवनात जेवढे आई व वडिलांना महत्त्व आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा घटक आहेत, त्यांच्यामुळेच देशाचे व समाजाचे आदर्श नागरिक घडतात. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न करणे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुखाचे व्हावे यासाठी नेहमी त्यांना मार्गदर्शन करणे अशी अनेक महत्वाची कामे शिक्षक करतात. केवळ पुस्तकी ज्ञान न शिकवता माणसाने माणूस म्हणून कसे जगावे याचे ज्ञान देखील ते देतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य आकार देतो असे प्रतिपादन तालुक्यातील अंबोडा येथे ग्रामपंचायत वतीने आयोजित केलेल्या साने गुरुजी गुरू गौरव सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून Tehsildar Vaishakh Wahurwagh वैशाख वाहूरवाघ बोलत होते.
 
 
ytlam
 
 
Tehsildar Vaishakh Wahurwagh : कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच वर्षा आडे तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी मोहंमद इकबाल मोहंमद उमर, माजी गटशिक्षणाधिकारी किशोर रावते, ज्येष्ठ साहित्यिक विनय मिरासे, उपसरपंच चंचला पावडे, ग्रामसेवक डॉ. विजयकुमार ठेंगेकर हे होते. कार्यक्रमाचे अ‍ॅड. अतुल राठोड यांनी केले. त्यानंतर जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे युनूस मलनस यांचा साने गुरुजी गुरू गौरव सन्मान तसेच मुख्याध्यापक नंदकिशोर राऊत, अंकुश मोरे, भाटी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन गुरू गौरव पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांनी केले. या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी विद्यार्थ्यांशी सवाद साधला.