बेशरमाचा वृक्ष...!

16 Sep 2024 16:59:53
 
 
 वेध 
- अनिरुद्ध पांडे
 
आपल्या जैवविविधतेत एक ‘बेशरम' नावाची pooja khedkar वनस्पती प्रजाती आहे. एखाद्या झुडपासारखी असलेली मोठ्या पानांची ही वनस्पती अगदी बेशरमसारखी वाढते. जिथे मूळ धरेल तिथे अस्ताव्यस्त वाढत राहते. कोणताही उपयोग नसलेली ही एक वनस्पती प्रजाती आहे. अशाच ‘अमरवेला' सारखे काही वनस्पती, काही कीटक, डास, झुरळ, माशी किंवा  उंदरासारखे काही प्राणी, जे कोणत्याही कामाचे नाहीत पण उपद्रवी मात्र निश्चित. उपद्रवाशिवाय कोणताही कवडीमात्र उपयोग नसलेल्या या जैवविविधतेसोबत त्यांचे उपद्रव झेलतच आपल्याला जगावे लागते. दुर्दैवाने त्यांचे निर्मूलन अजूनही आपल्या विज्ञानाला जमलेले नाही. उलट आपण ‘त्यांच्यासह जगायला शिकलो आहोत. ‘तिने त्याला झुरळासारखे झटकून टाकले किंवा ‘तो म्हणजे बेशरमाचे झाडच आहे' असे मानवी जीवनातील उल्लेख या पूर्णपणे निरुपयोगी जीवजंतूंबद्दल आपण करत असतो. बेशरम या झुडपी वनस्पतीचे झाडही कधी होत नसते, म्हणून निर्लज्ज व्यक्तीचा उल्लेख ‘बेशरमाचे झाड' असा आपण करतो. पण त्यातही काही लोक बेशरमपणाची परिसीमा ओलांडणारे आपल्याला आजूबाजूला दिसतात; त्यांचा उल्लेख ‘बेशरमाचा वृक्ष' असा व्हायला हवा आहे. असाच एक बेशरमाचा वृक्ष आपल्याला दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रातच आढळून आला आहे. तीन मोठमोठ्या फांद्या असलेल्या या बेशरमाच्या वृक्षाचे नाव आहे ‘खेडकर कुटुंब...! पूजा खेडकर ही या बेशरमाच्या वृक्षाची मुख्य फांदी असून तिचे वडील दिलीप आणि आई मनोरमा याही मुळीच लहान नसलेल्या फांद्या आहेत.
 
 
pooja khedkar
 
जसे बेशरमाचे झाड बेशरमसारखे  pooja khedkar वाढतच असते तसेच या देशात भ्रष्टाचाराचे आहे. तो संपतच नसतो. भ्रष्टाचाराचे झाड छाटा तरी ते संपत नाही, नष्ट तर मुळीच होत नाही. फक्त कुठे कमी तर कुठे जास्त एवढेच असते. या पूजा खेडकर नावाच्या बेशरमाच्या झाडाचा नव्हे वृक्षाचा आकार तर खूपच मोठा आहे. या झाडाला बेशरमपणाची, भ्रष्टाचाराची अनुवंशिक पृष्ठभूमी आहे. कशात काही नसताना आयएएसच्या रोपट्याला फक्त अंकुरच आला असताना पूजा खेडकरने घातलेला उधम म्हणजे बेशरमाचा वृक्षच म्हणता येईल. ही बाई आयएएस झाली खरी; पण तीसुद्धा खूप साऱ्या लांड्यालबाड्या करून...! खूप मोठा खोटारडेपणा करून आयएएस मिळवणाऱ्या या बाईला पहिली नियुक्ती मिळाली आणि तिच्यातील उपजत मग्रुरीला अंकुर नव्हे, तर धुमारेच फुटले, तेही पहिल्याच दिवसापासून. या पूजा खेडकरने आयएएस मिळवण्यासाठी खोटी, बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे, धादांत खोटे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, वेगवेगळी नावे दाखवून नियमांत बसत नसतानासुद्धा चक्क नऊ वेळा आयएएसची परीक्षा दिली.
 
नियमांनुसार नऊ परीक्षा pooja khedkar  देण्याची मर्यादा संपली, पण ही बाई पासच झाली नाही. त्यामुळे स्वत:च्या नावात, आईवडिलांच्या नावात बदल करून तिने अवैधरीत्या परीक्षा दिली. परीक्षेचा अर्ज भरताना फोटो बदलणे, सही बदलणे, पत्ता बदलणे असले उद्योग केल्याचेही सिद्ध झाले आहे. यूपीएससीच्या नियमांत नऊ वेळा ही आयएएसची परीक्षा देता येते. पण या पूजा खेडकरने मोठ्ठी भामटेगिरी करून तब्बल बारा वेळा आयएएसची परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे.
 
अनेक उटपटांग pooja khedkar  धंदे करून ‘खरी' आयएएस मिळवणाऱ्या या पूजाबाईने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्यानंतर उधम केला नसता तर सारेकाही ‘अळीमिळी गुपचिळी' असे साधून गेले असते. पण तिने माज दाखवला आणि वासे फिरले. याच पूजाला ती मसुरीच्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतही गैरवर्तणुकीसाठी तब्बल आठ वेळा मेमो बजावण्यात आले होते. महाराष्ट्रात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर राज्य प्रशासनाने तिची वर्तणूक पाहून पुण्यातून काही दिवसांतच तिला वाशीमला हलवले. दरम्यान, पूजा खेडकरचे कारनामे एकूणच उद्योग प्रकाशझोतात आले. शेवटी राज्य प्रशासनाने तिला १६ जुलै २०२४ रोजी वाशीममधून कार्यमुक्त केले. वाशीमच्या अल्प मुक्कामात तिने तेथील ओबीसी बांधवांची दिशाभूल करून, ‘मी ओबीसी असल्यामुळे नाहक त्रास दिला जात आहे' अशी भूमिका घ्यायला लावली होती.
 
यूपीएससी प्रशासनाने pooja khedkar या बाईला लगेचच अकादमीत हजर होण्याचे आदेश दिले. पण ती गेलीच नाही. नियमांनुसार संधी दिल्यानंतर अखेर ३१ जुलै २०२४ रोजी यूपीएससीने पूजा खेडकरची आयएसच्या उमेदवारीपासून सारीच प्रक्रिया रद्द करून टाकली. या दणक्यासोबतच तिला पुढे अशी कोणतीही परीक्षा देण्यापासून कायमचे प्रतिबंधितही करून टाकले. ही पूजा मुळात डॉक्टर असून तिने २००७ मध्ये वैद्यकीय शिक्षण घेताना आपण तंदुरुस्त असल्याचा अहवाल दिला होता. हीच बाई पुढे दिव्यांग कशी झाली हा यूपीएससीला पडलेला प्रश्न आहे. तिच्यावर बनावट कागदपत्रे प्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल झाला आहे. त्यात अटक होऊ शकणार असल्याने बेपत्ता झालेल्या पूजा खेडकरची अखेर भारत सरकारनेही ७ सप्टेंबर २०२४ ला हकालपट्टी केल्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे येती २०-२५ तरी वर्षे महाराष्ट्रातील प्रशासन आणि जनतेला पोखरू शकणारी ही पूजारूपी ‘उधळी' सध्यातरी खरोखरच विकलांग झाली आहे, हे मात्र खरे.
                                                                                                                                                                ९८८१७ १७८२९
                                                                                                                                                                   अनिरुद्ध पांडे
Powered By Sangraha 9.0