महायुतीच फोडणार दिवाळीत फटाके

02 Sep 2024 17:31:59
- एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
 
ठाणे, 
केवळ महायुतीच दिवाळीत फटाके फोडणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री Eknath Shinde एकनाथ शिंदे यांनी येणार्‍या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला. आपले राजकीय गुरू आनंद दिघे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करताना, माझ्या नेतृत्वातील शिवसेनेने त्यांची आणि तत्त्वे जोपासली असल्याचे रविवारी रात्री उशिरा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले. महायुती सरकारच्या सर्व योजना कायम ठेवण्याची तुम्हाला इच्छा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.
 
 
Shinde
 
विरोधकांना गल्लीत जाऊ द्या किंवा दिल्लीत, त्यांना कोणतेही महत्त्व देऊ नका. आपण केवळ काम करीत राहू. लोकसभा निवडणुकीसाठी नरेश म्हस्के यांना उमेदवारीला काही जणांनी विरोध केला. पण, ते निवडून आले. विरोधकांचे लक्ष सतत माझ्यावर असते, असे Eknath Shinde शिंदे यांनी त्यांची खिल्ली उडवताना सांगितले. शत्रूंना ज्याप्रमाणे पाण्यातही संताजी-धनाजी दिसायचे तसेच विरोधकांना एकनाथ शिंदे सर्वत्र दिसतात. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला आनंदी करण्यासाठी आपल्या सरकारने विविध योजना सुरू केल्या. सुशिक्षित तरुणांना प्रशिक्षण देणारे आणि उच्च आर्थिक मदत देणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0