सूरसप्तक आयोजित ’इमोर्टल लता ’ कार्यक्रम

25 Sep 2024 18:09:34
नागपूर,
Lata Mangeshkar स्वरसम्राज्ञी स्व लतादीदींच्या वाढदिवसा निमित्त ’इमोर्टल लता ’ या कार्यक्रमाचे आयोजन करून सूरसप्तक संस्था दीदींना स्वरसुमनांजली अर्पण करणार आहे. संस्थेच्या वर्धापन दिनी खास लतादीदींची सुमधुर गाणी गायक कलाकार सादर करणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता लक्ष्मीनगरच्या सायंटिफिक सभागृहात होईल. कार्यक्रमाची संकल्पना सुचित्रा कातरकर यांची, तर निर्मिती कार्याध्यक्ष प्रा. पद्मजा सिन्हा यांची आहे. आसावरी गलांडे निवेदन करणार आहेत.
 
song  
 
 मुकुल पांडे , डॉ. अमोल कुळकर्णी, आशिष घाटे, विजय देशपांडे, अरुण ओझरकर , धीरज आटे, आदित्य फडके , योगेश देशपांडे, प्रा. पद्मजा सिन्हा, प्रतिक्षा पट्टलवार , अश्विनी लुले , डॉ. येनुरकर , भगत , अर्चना उचके, अनुजा जोशी,लता पटेल हे गायक कलाकार लतादीदींची सुमधुर गाणी सादर करतील.Lata Mangeshkar यांना नचिकेत देव , आशिष घाटे, पंकज यादव , प्रमोद बावणे , विजय देशपांडे, नंदू गोहाणे , तुषार विघ्ने , गौरव टांकसाळे हे वादक कलाकार साथसंगत करतील. लतादीदींना देण्यात येणार्‍या या स्वरसुमनांजलीला रसिकांनी उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
सौजन्य: वर्षा किडे,कुळकर्णी संपर्क मित्र 
Powered By Sangraha 9.0