शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा उभारणार

25 Sep 2024 18:45:27
- राजकोट किल्ल्यावर पुन्हा फडकणार भगवा
- ६० फूट उंच पुतळ्यासाठी निविदा
 
मुंबई, 
सिंधुदुर्गातील Statue of Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र सरकारने, आधीच्या पुतळ्याच्या जवळपास दुप्पट, ६० फूट उंचीचा नवीन पुतळा उभारण्यासाठी निविदा काढली आहे, असे अधिकार्‍यांनी बुधवारी सांगितले. २० कोटी रुपये हा पुतळा बांधण्यात येणार असून, हे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने सहा महिन्यांची मुदत दिली आहे, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी ४ डिसेंबर (नौदल दिन) रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५ फूट उंच पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले पण, २६ ऑगस्ट रोजी वादळाच्या तडाख्यात हा पुतळा कोसळला.
 
 
Shivaji Maharaj
 
यानंतर विरोधी पक्षांनी अनेक आरोप केल्याने पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे याला अटक करण्यात आली. सिंधुदुर्गात पुतळा बसवण्याचा निर्णय आडमुठेपणाने घेण्यात आल्याने कामाचा दर्जा निकृष्ट झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी करीत सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर लागल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि पुतळा कोसळण्याच्या अवघ्या सहा दिवसांपूर्वी नौदल अधिकार्‍यांना पाठवलेल्या पत्रात कायमस्वरूपी उपाययोजना सुचवल्या होत्या.
 
 
Statue of Chhatrapati Shivaji Maharaj मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळ्याची रचना आणि बांधकाम भारतीय नौदलाने केल्याचे सांगितले होते. पुतळा कोसळला तेव्हा ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहत होते, असा दावा त्यांनी केला. नवीन पुतळ्याच्या बांधकामासाठी जारी करण्यात आली असून, पुतळ्याची उंची ६० फूट असेल. अभियांत्रिकी, स्थापना आणि देखभाल यासह एकूण खर्च आता २० कोटी रुपये असेल. सरकारने काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे, असे पीडब्ल्यूडी अधिकार्‍याने सांगितले.
Powered By Sangraha 9.0